वाहनचालकांची अर्थकारणाची बिघडलेली गाडी दुरूस्त होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:31 AM2021-05-25T04:31:00+5:302021-05-25T04:31:00+5:30

सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या अर्थकारणाची घडी पूर्ण बिघडली आहे. कडक निर्बंध लागू केल्यानंतर ...

When will the driver's faulty vehicle be repaired? | वाहनचालकांची अर्थकारणाची बिघडलेली गाडी दुरूस्त होणार कधी?

वाहनचालकांची अर्थकारणाची बिघडलेली गाडी दुरूस्त होणार कधी?

Next

सांगली : कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्यांच्या अर्थकारणाची घडी पूर्ण बिघडली आहे. कडक निर्बंध लागू केल्यानंतर जिल्ह्यातील गॅरेज व्यावसायिकांना दुकाने बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे गेल्या दीड महिन्यांहून अधिक काळापासून चारचाकी, दुचाकी वाहन दुरूस्तीच्या मिस्त्री यांसह वाहनांव्दारे व्यवसाय करणाऱ्यांनाही याचा फटका बसला आहे. त्यामुळे वाहनचालकांसह गॅरेज मालक, कामगारांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व व्यवसाय बंद ठेवण्यात आले आहेत. त्यात या हातावरचे पोट असणाऱ्या आणि कामगारांची संख्या जास्त असल्याने या वर्गाची चांगलीच आबाळ होत आहे. गेल्या ५० दिवसांहून अधिक वाहन दुरूस्तीचा व प्रवासासह इतर ठिकाणी होणारा प्रवास थांबला आहे. शहरात शंभरफुटी रोड, जुना बुधगाव रोडसह उपनगरांमध्येही वाहन दुरूस्तीची गॅरेज आहेत. हा व्यवसाय पूर्ण थांबला आहे. त्यातच इंधन दरवाढीचाही फटका बसला आहे.

गॅरेजमध्ये मुख्य मिस्त्रीसह अनेक कामगार कामाला असतात. हे सर्व कामगार सध्या घरीच आहेत. यातील अनेक परप्रांतीय असल्याने त्यांनी आपल्या गावी परत जाणे पसंत केले आहे. त्यामुळे गॅरेज मालकांना पुन्हा कामगार शोधतानाही अडचणीच येणार आहेत.

चौकट

वाहने सुरू गॅरेजला मात्र कुलूप

सध्या लॉकडाऊन सुरू असला तरी शहरासह जिल्ह्यात कुठेही फिरल्यास सर्वत्र वाहनांची मोठी गर्दी दिसून येत आहे. नियमांचे पालन होत नसल्याने नेहमीसारखीच गर्दी सध्यातरी रस्त्यावर दिसते आहे. तरीही प्रशासनाने गॅरेज बंद ठेवण्याचे आदेश दिल्याने वाहने रस्त्यावर आणि गॅरेज बंद अशी स्थिती आहे.

चौकट

वाहनचालकही अडचणीत

गॅरेजमालकांसह बँका, पतसंस्थांकडून वाहने कर्जावर घेऊन व्यवसाय करणारेही आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

कोट

गेल्या वर्षभरापासूनच व्यवसाय अडचणीत आहे. आता कुठे स्थिरस्थावर होत आहे असे वाटत असतानाच पुन्हा व्यवसाय बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा सर्व थांबले आहे. कोरोना संसर्ग वाढू नये याची काळजी घेऊन व्यवसाय सुरू करण्यास परवानगी द्यावी

अजित पाटील, गॅरेज मालक

कोट

सध्या संपूर्ण व्यवहार थांबल्याने अडचणी येत आहेत. काहीजण घरी बोलावत असले तरी त्यातही संसर्गाचा धोका आहे. त्यामुळे आता पूर्ण वेळ गॅरेज सुरू होतील अशी अपेक्षा आहे. गॅरेज व्यवसायावर अवलंबून असलेले अन्य घटकही अडचणीत आहेत.

- राजू ऐनापुरे, दुचाकी गॅरेज व्यावसायिक

कोट

गेल्यावर्षी कोरोनामुळे सुरू झालेल्या लॉकडाऊन पासूनच या व्यवसायावर अडचणी येत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक कारणांसाठी रस्त्यावर असलेल्या वाहनांचीही दुरूस्ती करणे जिकिरीचे बनले आहे.

अतुल देशमाने, वाहन व्यावसायिक

कोट

अगोदरच कर्जाचा डोंगर वाढत असताना व्यवसायही पूर्ण थांबला आहे. सध्या जिल्हा अंतर्गत प्रवासासाठी पासची आवश्यकता असल्याने अनेकजण प्रवास करणे टाळत आहेत. त्यामुळेही वाहनचालकांची वाहने घरासमोर थांबून आहेत.

अजित शिंदे, वाहन व्यावसायिक

चौकट

कार १२३०७८

जीप ५६९६०

दुचाकी ७५४२१३

रिक्षा १०५४०

ट्रक ११११८

रूग्णवाहिका २३६

Web Title: When will the driver's faulty vehicle be repaired?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.