सांगली जिल्ह्यातील अवकाळीचे पंचनामे पूर्ण होणार कधी?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2019 08:28 PM2019-11-10T20:28:28+5:302019-11-10T20:29:13+5:30

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७३ गावांतील १ लाख २५ हजार ६८ शेतकºयांच्या ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टरवरील बाधित क्षेत्रापैकी ९५ हजार ८८१ शेतकºयांचे ५४ हजार ५९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण होणे बाकी आहेत.

When will the premature punches in Sangli district be completed? | सांगली जिल्ह्यातील अवकाळीचे पंचनामे पूर्ण होणार कधी?

सांगली जिल्ह्यातील अवकाळीचे पंचनामे पूर्ण होणार कधी?

Next
ठळक मुद्देकडेगाव, कवठेमहांकाळ, जतसह इतर भागातही पंचनामे बाकी आहेत. त्यात या आठवड्यातही काही भागात पाऊस असून नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने, अंतिम अहवाल तयार करण्यात अडचणी येत आहेत.

सांगली : गेल्या महिन्याभरापासून जिल्ह्यात धुमाकूळ घालत असलेला मान्सूनचा परतीचा पाऊस आणि त्यानंतरच्या अवकाळीमुळे शेतकºयांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. हाता-तोंडाशी आलेले पीक पाण्यात वाया गेल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे सुरू असले तरी, अजूनही क्षेत्रात वाढच होत असल्याने पंचनामे पूर्ण होऊन भरपाईची कार्यवाही होणार तरी कधी, असा सवाल शेतक-यांना पडला आहे.

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील ५७३ गावांतील १ लाख २५ हजार ६८ शेतकºयांच्या ३ लाख ७७ हजार ११९ हेक्टरवरील बाधित क्षेत्रापैकी ९५ हजार ८८१ शेतकºयांचे ५४ हजार ५९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत. पण अद्यापही तीस टक्क्यांहून अधिक क्षेत्रावरील पंचनामे पूर्ण होणे बाकी आहेत.

प्रशासनाच्यावतीने ७ नोव्हेंबरपर्यंत पंचनामे पूर्ण करण्याचे नियोजन करण्यात आले होते. वरिष्ठ पातळीवरून त्या आशयाच्या सूचनाही देण्यात आल्या होत्या. मात्र, बाधित क्षेत्रामध्ये वाढच होत असल्याने कृषी व महसूल विभागाच्या अधिकाºयांना पंचनामे पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत. तासगाव तालुक्यातील २५ हजार ९७ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण असून ९ हजार ७ हेक्टरवरील पंचनामे अद्यापही होणार आहेत. आटपाडीत २४२९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण झाले आहेत, तर अद्यापही काही क्षेत्रातील पंचनामे पूर्ण नाहीत. खानापूर तालुक्यातील ५ हजार ५५ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण असले तरी, ३ हजार ४६९ हेक्टरवरील पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया अद्यापही सुरू आहे. यासह कडेगाव, कवठेमहांकाळ, जतसह इतर भागातही पंचनामे बाकी आहेत. त्यात या आठवड्यातही काही भागात पाऊस असून नुकसानीच्या क्षेत्रात वाढ होत असल्याने, अंतिम अहवाल तयार करण्यात अडचणी येत आहेत.

Web Title: When will the premature punches in Sangli district be completed?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.