कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी होणार? ज्येष्ठांना सतावतेय चिंता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2021 04:26 AM2021-05-21T04:26:27+5:302021-05-21T04:26:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क सांगली : १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला शासनाने खो दिल्याने लसीकरणाचा उद्देशच असफल होण्याची ...

When will young people in the family be vaccinated? Anxiety plaguing seniors | कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी होणार? ज्येष्ठांना सतावतेय चिंता

कुटुंबातील तरुणांचे लसीकरण कधी होणार? ज्येष्ठांना सतावतेय चिंता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

सांगली : १८ ते ४४ वर्ष वयोगटातील नागरिकांच्या लसीकरणाला शासनाने खो दिल्याने लसीकरणाचा उद्देशच असफल होण्याची भीती निर्माण झाली आहे. कुटुंबातील ज्येष्ठांचे लसीकरण झाले, पण लस न घेतलेल्या तरुणांमुळे त्यांना संसर्गाची भीती आहे.

लसींच्या टंचाईमुळे लसीकरणाचे घोडे अडले आहे. जिल्ह्यात सुमारे २७ लाख लोकांचे लसीकरण अपेक्षित आहे, आतापर्यंत फक्त सहा लाखजणांना लस मिळाली आहे. कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याच्या या काळात लस हीच एकमेव मात्रा तूर्त सुरक्षेचे साधन ठरली होती. तीदेखील आता बंद झाल्याने अस्वस्थता निर्माण झाली आहे. मंगळवारअखेर ६० वर्षांवरील २ लाख ९५ हजार ७६ ज्येष्ठांना लस मिळाली होती. त्या तुलनेत १८ ते ४४ वर्ष वयोगटातील फक्त १६ हजार ५१८ जणच लसीचे लाभार्थी ठरले आहेत.

हा वयोगट नोकरी, व्यवसायानिमित्ताने दिवसभर घराबाहेर असतो. त्यामुळे संसर्गाचा अधिक धोका त्यांना असतो. त्यामुळे त्यांना प्राधान्याने लस मिळणे आवश्यक असल्याच्या प्रतिक्रिया ज्येष्ठांमधून व्यक्त होत आहेत. दुसऱ्या लाटेमध्ये तरुणवर्गाला संसर्गाचा धोका जास्त असल्याचा शासनाचाच दावा आहे. लसीकरणात मात्र या वयोगटाला मागे ठेवल्याने पालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. हा तरुणवर्ग घरात परतल्यानंतर कुटुंबातील अन्य सदस्यांसाठीही कोरोनावाहक ठरण्याची भीती आहे. शासनाने तरुणवर्गाला प्राधान्य द्यायला हवे, अशी त्यांची मागणी आहे.

पॉईंटर्स

जिल्ह्यात आतापर्यंत झालेले लसीकरण

- ज्येष्ठ - पहिला डोस २,३५,३१०, दुसरा डोस २,९५,०७६

- ४५ ते ६० - पहिला डोस २,२९,२०८, दुसरा डोस २९,२४७

- १८ ते ४४ - पहिला डोस १६,५१८, दुसरा डोस ०००

कोट

ज्येष्ठांना प्राधान्याने लस दिली तरी दुसरा डोस अद्याप मिळालेला नाही. त्यामुळे ते १०० टक्के सुरक्षित झालेले नाहीत. या स्थितीत तरुणांना लसीपासून वंचित ठेवल्यास कोरोनाचा संसर्ग वाढू शकतो. तरुण मंडळी कामानिमित्त दिवसभर बाहेर असतात, पदोपदी कोरोनाच्या धोक्याला सामोरी जात असतात. त्यामुळे शासनाने त्यांचे लसीकरण प्राधान्याने करायला हवे.

- अरुणराज कुलकर्णी, पालक

केंद्र सरकारने लसीचा पुरेसा पुरवठा करायला हवा, तरच तरुणांचे लसीकरण शक्य आहे. ज्येष्ठांचे लसीकरण झाले तरी ते पूर्णत: सुरक्षित झाल्याचे म्हणता येणार नाही. कुटुंबातील सर्व तरुण सदस्यांसह सर्वांचे लसीकरण झाले तरच कोरोनाशी मुकाबला शक्य आहे. त्यामुळे तरुणांना लस मिळायला हवी.

- अस्लम पटेल, पालक

१८ ते ४४ आणि ४५ ते ५९ वयोगटातील सर्वांना किमान पहिला डोस तरी दिलाच पाहिजे, तरच कोरोनापासून संरक्षण मिळेल. सध्या अर्धवट लसीकरणामुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात आपण अपयशी ठरत आहोत. विशेषत: तरुणांचे प्राधान्याने लसीकरण झाले तर व्यवसाय, धंदे, नोकऱ्या सुुरू करणे शक्य होईल. गेल्या दोन वर्षांची आर्थिक कोंडी फोडता येईल.

- महादेव साळुंखे, पालक

Web Title: When will young people in the family be vaccinated? Anxiety plaguing seniors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.