कुजबुज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:18 AM2021-07-02T04:18:21+5:302021-07-02T04:18:21+5:30
...तरी बरं वर्षभराने बैठक घेतली नाही महापालिकेची सत्ता गमावल्यापासून भाजपमध्ये मोठी अस्वस्थता आहे. सत्ता जावून चार महिने झाले तरी ...
...तरी बरं वर्षभराने बैठक घेतली नाही
महापालिकेची सत्ता गमावल्यापासून भाजपमध्ये मोठी अस्वस्थता आहे. सत्ता जावून चार महिने झाले तरी नेत्यांनी दखल घेतली नाही. उलट दोन-चार नगरसेवकांनाच सोबत घेत नेतेमंडळी पक्षाचा कारभार हाकत होती. बाकीच्या नगरसेवकांना कोणीच विचारत नव्हते. त्यामुळे भाजपचे नगरसेवक राष्ट्रवादीच्या वळचणीला जातात की काय, अशी कुजबूजही सुरु झाली होती. ही कुणकुण नेत्यांच्या कानावर पडली. अखेर सर्वांना बैठकीचे निमंत्रण दिले गेले. एका मंगल कार्यालयात सहभोजनासह बैठक झाली. महापालिकेत आक्रमक व्हा, असा संदेशही नेत्यांनी दिला. उपदेशाचे डोस झाल्यावर एकाने बरं झालं बैठक चार महिन्यांनी तरी घेतली. वर्षभराने घेतली असती तर बैठकीला केवळ नेतेमंडळीच उरली असती, अशी प्रतिक्रिया दिली. हे पाहून दुसर्याने त्याला चिमटा काढत भोजनावर लक्ष देण्याचा सल्ला दिला.