मणदूरपैकी धनगरवाड्यात जमीन नेमकी कोणाची?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2021 04:25 AM2021-05-16T04:25:05+5:302021-05-16T04:25:05+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क कोकरुड : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र होण्याअगोदर पणजोबा, खापर पणजोबा जी शेती कसून खात ...

Who owns the land in Dhangarwada? | मणदूरपैकी धनगरवाड्यात जमीन नेमकी कोणाची?

मणदूरपैकी धनगरवाड्यात जमीन नेमकी कोणाची?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

कोकरुड : दीडशे वर्षांपेक्षा जास्त म्हणजे देश स्वतंत्र होण्याअगोदर पणजोबा, खापर पणजोबा जी शेती कसून खात होते, तेवढीच शेती आजही आम्ही कसून खात आहोत. ज्या शेतात वरी, नाचणी, कारेळा, भात याची पेरणी, उगवणी केली; तीच जमीन तुमच्या नावावर नाही असे वनविभाग सांगत आहे. अशी व्यथा शिराळा तालुक्यातील मणदूरपैकी धनगरवाडा, विनोबाग्राम या गावतील नागरिक मांडत आहेत.

धनगरवाडा ५६ घरांचे आणि चारशे लोकसंख्येचे, तर विनोबा ग्राम १६ घरांचे आणि शंभर लोकांची वस्ती आहे. स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी नेमिनाथ कत्ते गुरुजी यांनी बसविलेल्या या वस्त्या आहेत. या दोन्ही वस्त्या बफर झोनमध्ये येत असून, मणदूर ग्रामपंचायतीला जोडल्या आहेत. येथील नागरिक पूर्वीपासून सुमारे साडेतीनशे एकर शेती पिकवत आहे. अशी परिस्थिती असताना वनविभाग ही जमीन संबंधित शेतकऱ्यांची नसल्याचे सांगत आहे.

याबत महसूल विभागाने १९६७ ला दिलेल्या आदेशात म्हटले आहे, १६६ एकर क्षेत्रावर वनक्षेत्र राहणार नाही म्हणजे ते क्षेत्र धनगरवाडा, विनोबा ग्राम यांचे आहे, तर वनविभाग सांगते तुम्हाला ३४ एकर पेक्षा (गट नंबर २२२ मधील) जास्त जमीन मिळणार नाही. त्यामुळे गट नंबर २२१ अ/ब/क मधील जमीन नेमकी कोणाची हा वाद स्थानिक शेतकरी आणि वनविभाग यांच्यात गेल्या ८० वर्षांपेक्षा जास्त काळ सुरू आहे.

कोट

गेल्या दीडशे वर्षांपासून धनगरवाडा, विनोबाग्राम येथील पिढीजात शेतकरी तीनशे ते साडेतीनशे एकर जमीन कसत आहे. पिके घेत आहे. त्यामुळे सातबाराला नावे आहेत की नाहीत हे आम्हाला माहीत नसून, वनविभागाने त्यांच्या जमिनीची मोजणी करून हद्द ठरवावी. आमच्या जमिनीत येऊ नये.

- बाबूराव डोईफोडे, शेतकरी धनगरवाडा (मणदूर).

Web Title: Who owns the land in Dhangarwada?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.