सांगलीचा खासदार कोण?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 23, 2019 12:08 AM2019-04-23T00:08:53+5:302019-04-23T00:08:57+5:30

 सांगली । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान पार पडत आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी ...

Who is the Sangli MP? | सांगलीचा खासदार कोण?

सांगलीचा खासदार कोण?

googlenewsNext

 सांगली । लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यात सांगली, हातकणंगले लोकसभा मतदारसंघासाठी मंगळवारी मतदान पार पडत आहे. यासाठी प्रशासनातर्फे जय्यत तयारी करण्यात आली आहे. निवडणुकीत सांगली लोकसभा मतदारसंघातून १२ उमेदवार नशीब अजमावत असून, त्यात भाजपचे संजयकाका पाटील, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विशाल पाटील, वंचित बहुजन आघाडीचे गोपीचंद पडळकर यांच्यासह विविध पक्षांचे उमेदवार, तसेच अपक्ष रिंगणात आहेत. सकाळी ७ वाजता मतदानाला प्रारंभ होणार असून सायंकाळी ६ वाजता मतदान पूर्ण होईल. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत मतदार कोणाच्या बाजूने कौल देणार, कोण बाजी मारणार आणि राजकीय समीकरणांवर त्याचा काय परिणाम होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
कोण आहेत उमेदवार?
उमेदवाराचे नाव पक्ष
शंकर माने बीएसपी
संजयकाका पाटील भाजप
आनंदा पाटील बळीराजा प.
गोपीचंद पडळकर वं. ब. आ.
डॉ. राजेंद्र कवठेकर बमुपा
विशाल पाटील स्वा.शे.सं.
अभिजित आवाडे-बिचुकले अपक्ष
अधिकराव चन्ने अपक्ष
दत्तात्रय पाटील अपक्ष
नारायण मुळीक अपक्ष
भक्तराज ठिगळे अपक्ष
हिंमत कोळी अपक्ष

त्रासदायक मतदारसंघ
भैरववाडी (ता. तासगाव), सोनसळ (कडेगाव), गार्डी (खानापूर), बावची, बागणी (वाळवा), कुंडलापूर (शिराळा), महापालिका शाळा क्र. ९, आर. बी. उर्दु, मराठी शाळा (मिरज), महापालिका शाळा क्र. २९, सांगली (सांगली) तडसर (कडेगाव), शाळा क्र. २, मार्केट यार्ड गोदाम, नगरपरिषद सामाजिक सभागृह व बालशाळा, माळी गल्ली (तासगाव), देशिंग (कवठेमहांकाळ), जिल्हा परिषद शाळा क्र. ३ (जत), कोंत्यावबोबलाद (जत) येथील एकूण २२ केंद्रे त्रासदायक प्रकारामध्ये समाविष्ट केली आहेत. तेथे प्रशासकीय स्तरावर विशेष दक्षता घेऊन त्याप्रमाणावर बंदोबस्त लावण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

काही गडबड झाली तर काय?
शहरातील कोणत्याही भागात मतदानाच्या वेळी कसलीही गडबड झाली किंवा कुठे कायदा व सुव्यवस्थेची स्थिती निर्माण झाली, तर अवघ्या ५ ते ७ मिनिटात शीघ्र कृती दल (क्यूआरटी) तेथे पोहोचेल. कोणत्याही स्थितीचा सामना करण्यासाठी सीआयएसएफ व एसआरपीएफची कंपनी तेथे तात्काळ धाव घेईल आणि स्थिती निर्माण करणाºयावर कडक कारवाई करेल. मंगळवारी सकाळपासून मतदान संपेपर्यंत सांगली जिल्ह्यातील पोलीस दल सर्वच बंदोबस्ताची जबाबदारी सांभाळणार आहेत. त्रासदायक मतदान केंद्राजवळ फिरती, साध्या वेशातील पथके तैनात केली आहेत. तसेच सीसीटीव्ही कॅमेरा असलेली अत्याधुनिक पोलीस वाहने ठेवली आहेत.


सायंकाळी ६ पर्यंत रांगेत असलेल्यांना करता येणार मतदान
मतदानाच्या दिवशी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रांगेत राहता येईल. रांगेत असलेल्या शेवटच्या मतदारापर्यंत टोकन दिले जाईल. रांगेत
असलेल्या त्या मतदाराचे मतदान होईपर्यंत मतदानाची प्रक्रिया चालेल. त्यानंतर
कुणालाही मतदान करता येणार नाही.

जीपीएस यंत्रणा असलेल्या
ट्रकने ईव्हीएम पोहोचविणार
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर प्रत्येक मतदान केंद्रातील ईव्हीएम सील करून ती आपापल्या विधानसभानिहाय स्ट्राँग रूमवर आणली जातील. तिथे पुन्हा व्यवस्थित तपासणी होऊन सर्व ईव्हीएम एका ट्रकमध्ये भरून कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत सांगलीच्या विजयनगर येथील स्ट्राँग रूममध्ये पोहोचविली जातील.

Web Title: Who is the Sangli MP?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.