शिरढोणमधील पोलीस गेले कुणीकडे?

By Admin | Published: December 4, 2014 11:22 PM2014-12-04T23:22:21+5:302014-12-04T23:42:35+5:30

चौकी नेहमी बंदच : सहा गावातील ग्रामस्थांना कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याचाच सहारा

Who was the police in Shirdhon? | शिरढोणमधील पोलीस गेले कुणीकडे?

शिरढोणमधील पोलीस गेले कुणीकडे?

googlenewsNext

शम्मू मुल्ला - शिरढोण -मिरज-पंढरपूर राज्य मार्गालगत शिरढोण (ता. कवठेमहांकाळ) येथे पोलीस चौकीची स्वतंत्र इमारत आहे. पण ती गेल्या कित्येक महिन्यांपासून बंद असल्याने नागरिकांना कवठेमहांकाळ पोलीस ठाण्याकडे धाव घ्यावी लागत आहे. त्यामुळे गेले पोलीस कुणीकडे, असा सवाल नागरिकांतून होत आहे.
मिरज- पंढरपूर रस्त्याचे लवकरच अंकली ते नागजपर्यंत डांबरीकरण होणार आहे. या मार्गावरील मध्यवर्ती ठिकाण असणाऱ्या शिरढोण येथे दर गुरुवारी आठवड्याचा बाजार भरतो आणि दररोज या मध्यवर्ती ठिकाणी प्रवासी आणि नागरिकांना गर्दीच्या कोंडीला सामोरे जावे लागते.मिरज— पंढरपूर राज्य मार्गावर लहान-मोठे अपघात होतात. त्यामुळे खरशिंग फाटा ते लांडगेवाडी या पोलीस चैकीची गरज आहे. जर या मार्गावर अपघात झाल्यास सुमारे दहा कि. मी. कवठेमहांकाळ ठाण्यात धाव घ्यावी लागते. कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यासह शिरढोण येथील पोलीस चौकी तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल देशमुख यांनी सुशोभिकरण केले. येथील पोलीस चौकीला घाणीचे साम्राज्य प्राप्त झाले होते.
तत्कालीन आघाडी सरकार मधील गृहमंत्री व सध्याचे आमदार आर. आर. पाटील (आबा) हे तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर असल्यावर ही पोलीस चौकी उघडली जायची परत नंतर हा दौरा संपला की पुन्हा एकदा बंद केली जायची. चौकीकडे पोलीस कर्मचारी नंतर मात्र फिरकतही नव्हते.
या चौकीच्या कार्यक्षेत्रात शिरढोणसह मळणगाव, बोरगाव, अलकूड (एम), लांडगेवाडी, जायगव्हाण या गावांचा समावेश आहे. पोलीस चौकीचे तत्कालीन जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विनोद लोखंडे यांनी थाटात उदघाटन केले. ही चौकी उदघाटनानंतर काही वर्षे व्यवस्थित सुरू केली, पण पुन्हा ही चौकी कायमस्वरुपी बंद आहे.
शिरढोण चौकी पुन्हा उघडल्यास या परिसरात होणाऱ्या चोऱ्यांना आळा बसणार आहे. वाहतुकीची कोंडीही कायम स्वरुपी नाहीशी होऊन नागरिक व प्रवासी यांना मोकळा श्वास घेता येईल.

गृहमंत्र्यांच्या दौऱ्यानंतर बंद
तत्कालीन आघाडी सरकारमधील गृहमंत्री व सध्याचे आमदार आर. आर. पाटील (आबा) हे तासगाव व कवठेमहांकाळ तालुक्याच्या दौऱ्यावर असल्यावर ही पोलीस चौकी उघडली जायची, परत नंतर हा दौरा संपला की पुन्हा एकदा बंद केली जायची. याकडे पोलीस कर्मचारी फिरकतही नव्हते.

Web Title: Who was the police in Shirdhon?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.