लॅण्डमाफियांना रोखणार कोण?

By admin | Published: January 16, 2015 11:06 PM2015-01-16T23:06:35+5:302015-01-16T23:42:42+5:30

फसलेले न्यायाच्या प्रतीक्षेत : यंत्रणेतील दोष दूर होण्याची गरज

Who will stop landmafia? | लॅण्डमाफियांना रोखणार कोण?

लॅण्डमाफियांना रोखणार कोण?

Next

सचिन लाड - सांगली - प्लॉट हडप करणाऱ्या टोळ्या ग्रामीण भागातही सक्रिय आहेत. देवस्थानच्या जमिनीही लाटण्याचे प्रकार सुरु आहेत. लॅण्डमाफिया आणि शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या संगनमतामुळे दिवसेंदिवस प्लॉट हडप करण्याचे प्रकार वाढत आहेत. तक्रार करुनही पोलीस आणि महसूलचे अधिकारी कोणतीही दखल घेत नाहीत. परिणामी फसगत झालेल्या लोकांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. आज ना उद्या न्याय मिळेल, या प्रतीक्षेत हे लोक वर्षानुवर्षे आहेत.
महापालिका क्षेत्रासह जिल्ह्यातही प्लॉट हडप करणाऱ्या लॅण्डमाफियांच्या टोळ्या कार्यरत आहेत. या टोळ्यांच्या दहशतीला घाबरुन लोक तक्रार करण्यास पुढे येत नाहीत. तक्रार केली, तर पोलीस त्याची दखल घेत नाहीत. नगरभूमापन, तलाठी कार्यालयातील अधिकारी वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे अपील करण्याचा सल्ला देतात. शासकीय यंत्रणेत कोणताही समन्वय नाही. त्याचा फटका सर्वसामान्यांना बसत आहे. गुंठेवारीतील प्लॉट खरेदी-विक्रीची नोंद होत नाही. केवळ नोंदणीकृत वकिलासमोर खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो. (समाप्त)

प्लॉट हडप करणाऱ्या टोळीशी महसूलच्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे आहेत. खरेदी-विक्रीची नोंद करण्यास तलाठी टाळाटाळ करतात. जी नियमावली आहे, त्याचे पालन केले जात नाही. परिणामी लोकांची फसवणूक होण्याचे प्रकार वाढत आहेत.
- राजू ऐवळे, सामाजिक कार्यकर्ते, सांगली.


प्लॉट हडप केलेल्या जुन्या तक्रारी असतील, तर त्यांची चौकशी केली जाईल. नवीन तक्रारी आल्या, तर त्यांची चौकशी करण्यासाठी स्वतंत्र पथक नियुक्त केले जाईल. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठी पोलिसांची नेहमीच सकारात्मक भूमिका राहिली आहे.
- दिलीप सावंत,
जिल्हा पोलीसप्रमुख

प्रशासनाच्या त्रुटींचा लॅण्डमाफिया गैरफायदा घेत आहेत. फसगत लोकांना न्यायासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागत आहेत. ही प्रकरणे निकालात काढण्यासाठी जलदगती न्यायालयांची स्थापना करण्याची गरज आहे. शासकीय यंत्रणेतील दोषही दूर होण्याची गरज अहे.
- रोहित चिवटे, मिरज.

प्लॉटच्या माध्यमातून फसवणूक झालेल्या लोकांची शासन दरबारी दखल घेतली पाहिजे. पोलिसही फसवणुकीला बळी पडल्याने सर्वसामान्यांचे काय? प्लॉट खरेदी-विक्रीच्या रितसर नोंदी झाल्या तर फसरणुकीच्या घटना टळू शकतील. यासाठी प्रशासने सकारान्मक पाऊल टावले पाहिजे.
-प्रशांत पवार, विश्रामबाग

Web Title: Who will stop landmafia?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.