Jayant Patil: बाबरीपतनाची जबाबदारी फडणवीसांनी तेव्हा का घेतली नाही?, जयंत पाटलांचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: May 3, 2022 03:37 PM2022-05-03T15:37:12+5:302022-05-03T15:37:43+5:30

कारसेवकांबरोबर सहभागाचा तो किस्सा सविस्तर सांगण्याची विनंती मी फडणवीस यांना भेटीवेळी करेन. त्यांनी सर्व घटनाक्रम मला व्यवस्थित सांगावा, अशी इच्छा आहे.

Why didn devendra fadnavis take the responsibility of Babripatn then, Jayant Patil's question | Jayant Patil: बाबरीपतनाची जबाबदारी फडणवीसांनी तेव्हा का घेतली नाही?, जयंत पाटलांचा सवाल

Jayant Patil: बाबरीपतनाची जबाबदारी फडणवीसांनी तेव्हा का घेतली नाही?, जयंत पाटलांचा सवाल

Next

सांगली : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बाबरीपतनावेळी त्याठिकाणी होते असा दावा करीत असतील तर त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंप्रमाणे तेव्हा जबाबदारी का स्वीकारली नाही, असा खोचक सवाल राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला.

ते म्हणाले की, फडणवीस माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी त्यांच्या बऱ्याच गोष्टी मला सांगितल्या, पण आजवर बाबरीपतनात ते सहभागी असल्याचे कधीच सांगितले नाही. इतकी वर्षे त्यांनी ही गोष्ट माझ्यापासून का लपविली, असा प्रश्न मला पडला आहे. बाळासाहेब ठाकरेंनी लगेच बाबरीपतनाची जबाबदारी स्वीकारली होती. त्यावेळी फडणवीस यांनी जबाबदारी का स्वीकारली नाही? कारसेवकांबरोबर सहभागाचा तो किस्सा सविस्तर सांगण्याची विनंती मी फडणवीस यांना भेटीवेळी करेन. त्यांनी सर्व घटनाक्रम मला व्यवस्थित सांगावा, अशी इच्छा आहे.

धार्मिक राजकारणावर जयंत पाटील म्हणाले की, मार्क्सने म्हटल्याप्रमाणे धर्म ही अफूची गोळी आहे. हीच गोळी सर्वसामान्य जनतेला देऊन त्यांना महागाईच्या प्रश्नापासून अलिप्त ठेवायचा प्रयत्न केंद्र सरकार करीत आहे. धार्मिक वाद निर्माण करण्यासाठी मोदी सरकार काही बुजगावण्यांना पुढे करीत आहे. सरकार चालविण्यामधील अपयश लपविण्यासाठी त्यांचा हा केविलवाणा प्रयत्न आहे. सामान्य माणूस अशा गोष्टींना बळी पडणार नाही, याची आम्हाला खात्री वाटते.

मनसेची तेवढी ताकद नाही

महाराष्ट्रात भोंग्याच्या प्रश्नावर आंदोलनाचा इशारा मनसेने दिला असला तरी राज्यभर असे आंदोलन करण्याची ताकद मनसेकडे नाही. मनसेला जर अन्य पक्षाची ताकद मिळाली तर ते शक्य आहे. त्यामुळे पोलिस योग्य ती दखल घेऊन त्यांच्यावर कारवाई करतील, असे जयंत पाटील म्हणाले.

आम्हाला सुरक्षेची गरज वाटली नाही

आमदार असताना आम्हाला कधीच सुरक्षेची गरज भासली नाही. सध्याचे काही आमदार, नेते यांना राष्ट्रीय सुरक्षा यंत्रणा पुरवित आहे. देशाच्या दृष्टीने हे लोक त्यांना महत्त्वाचे वाटत असावेत, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

Web Title: Why didn devendra fadnavis take the responsibility of Babripatn then, Jayant Patil's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.