संजय पाटलांचा कवलापुरात एमआयडीसीसाठी हट्ट का?, भाजपकडून खासदारांना घरचा आहेर

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 05:06 PM2023-01-17T17:06:07+5:302023-01-17T17:06:54+5:30

'कवलापूर विमानतळासाठी जनआंदोलन उभारणार'

Why insist on MIDC in Kavalapur, BJP state secretary Prithviraj Pawar asked MP Sanjay Patal | संजय पाटलांचा कवलापुरात एमआयडीसीसाठी हट्ट का?, भाजपकडून खासदारांना घरचा आहेर

संग्रहीत फोटो

googlenewsNext

सांगली : मणेराजुरी, अलकुड येथील एमआयडीसीला खासदार संजय पाटील यांनी विरोध केला. त्या परिसरात प्रदूषण वाढण्याची भीती त्यांना आहे. मग कवलापुरात एमआयडीसीसाठी हट्ट का, असा सवाल भाजपचे प्रदेश सचिव पृथ्वीराज पवार यांनी पत्रकार बैठकीत उपस्थित केला. कवलापूर विमानतळासाठी जनआंदोलन उभारण्याची घोषणाही यावेळी केली.

कवलापूर विमानतळ बचाव कृती समितीच्या वतीने सोमवारी पत्रकार बैठकीत पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, माजी आमदार नितीन शिंदे यांनी भूमिका मांडली. पवार म्हणाले की, कवलापूर येथील जागेत विमानतळ व्हावे, अशी जनतेची इच्छा आहे. पण काहींनी ही जागा हडपण्याचा डाव आखला आहे. खा. पाटील यांचा मणेराजुरी, अलकुड एमआयडीसीला विरोध आहे. पण कवलापुरात एमआयडीसीसाठी ते हट्ट करीत आहेत. एमआयडीसी झाल्यास या परिसरातील लोकांचे आरोग्य बिघडणार नाही का? कमी किमतीत जागा घेऊन जादा दराने विकण्याचे ‘ब्लॅक मार्केटिंग’ सुरू असल्याचा आरोप केला.

साखळकर म्हणाले की, कवलापूर विमानतळासाठी ११२ एकर जागा घ्यावी लागणार आहे. सध्या धावपट्टीसाठी आरक्षित जागेवर बांधकामे झालेली नाहीत. त्यामुळे भूसंपादन होऊ शकते. जिल्हाधिकाऱ्यांनी उद्योग, व्यवसायासाठी गायरान जमिनी देण्याची तयारी दर्शविली आहे. उद्योजकांनी त्या जमिनीवर उद्योग उभारावेत. कवलापूरच्या जागेत विमानतळ व्हावे, यासाठी टप्प्याटप्प्याने आंदोलन छेडणार आहोत.

नितीन शिंदे म्हणाले की, कवलापूर विमानतळासाठी निवेदने, धरणे, निदर्शने, रास्ता रोको, सांगली बंद आंदोलन करणार आहोत. तसेच केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांची भेट घेणार आहोत. कोणत्याही स्थितीत कवलापुरात विमानतळ झाले पाहिजे, अशी मागणी केली.

सांगली स्पाईस एक थोतांड

सांगली स्पाईस संघटना एक थोतांड आहे. यातील बहुतांश लोकांना विमानतळाची जागा हडप करायची आहे. या संघटनेतील ३५० लोक कोण आहेत? त्यांनाच उद्योग का उभारायचा आहे. यातील अनेकांनी मार्केट यार्डाची सावळीतील जागा घेतली आहे. काहींनी वसमत येथे उद्योग सुरू केले आहेत. जिल्ह्यात कोण उद्योजक होणार, हे ठरविणारे सुरेश पाटील व सतीश मालू कोण, असा सवाल पृथ्वीराज पवार यांनी उपस्थित केला.

Web Title: Why insist on MIDC in Kavalapur, BJP state secretary Prithviraj Pawar asked MP Sanjay Patal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.