कुपवाड मुख्य रस्त्यावरील धोकादायक पुलाचे रूंदीकरण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2021 07:19 AM2021-02-05T07:19:29+5:302021-02-05T07:19:29+5:30

कुपवाड : कुपवाड जकात नाका ते वसंतदादा सूतगिरणी या मुुख्य रस्त्यावर असलेल्या ओढ्यावरील पुलाचा कठडा ढासळला असल्याने त्यावरील पूल ...

Widen the dangerous bridge on Kupwad main road | कुपवाड मुख्य रस्त्यावरील धोकादायक पुलाचे रूंदीकरण करा

कुपवाड मुख्य रस्त्यावरील धोकादायक पुलाचे रूंदीकरण करा

Next

कुपवाड : कुपवाड जकात नाका ते वसंतदादा सूतगिरणी या मुुख्य रस्त्यावर असलेल्या ओढ्यावरील पुलाचा कठडा ढासळला असल्याने त्यावरील पूल धोकादायक बनला आहे. त्याचे येत्या आठ दिवसात रूंदीकरण करावे. अन्यथा प्रभाग समिती कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा कुुपवा शहर व परिसर संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

याबाबत कुपवाड संघर्ष समितीने प्रभाग तीनचे सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड व बांधकाम विभागाचे अशोक कुंभार यांच्यासह अन्य अधिकारी यांना प्रत्यक्ष जागेवर बोलावून ही धोकादायक बाब निदर्शनास आणून दिली. चोवीस मीटर रूंद पुलाच्या डांबरीकरणाच्या कामासह सीडी वर्क मंजूर झाले आहे. त्यामुळे येत्या आठ दिवसात काम सुरू करून पूर्ण करून देण्याची ग्वाही सहायक आयुक्त गायकवाड यांनी दिली.

त्यांच्याकडून दिरंगाई झाल्यास प्रभाग समिती कार्यालयास टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा संघर्ष समितीच्यावतीने देण्यात आला आहे.

नगरसेवक विष्णू माने यांनी अधिकाऱ्यांना सूचना दिल्या. यावेळी अध्यक्ष सनी धोतरे, उपाध्यक्ष प्रवीण कोकरे, कार्याध्यक्ष अनिल कवठेकर, सचिव विलास माळी, खजिनदार प्रकाश व्हनकडे, संचालक महावीर खोत, समीर मुजावर, अमोल कदम, विजय खोत आदी उपस्थित होते.

फोटो ओळ : कुपवाड संघर्ष समितीने प्रभाग तीनचे सहायक आयुक्त दत्तात्रय गायकवाड व बांधकाम विभागाचे अशोक कुंभार यांच्यासह धोकादायक पुलाची पाहणी केली.

Web Title: Widen the dangerous bridge on Kupwad main road

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.