इस्लामपुरातील क्षीरसागर ओढ्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2021 04:29 AM2021-02-11T04:29:25+5:302021-02-11T04:29:25+5:30
इस्लामपूर : इस्लामपूर-सांगली रस्त्यालगतच्या क्षीरसागर ओढ्याच्या रुंदीकरणाचे काम जलसंधारण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ओढ्याची ...
इस्लामपूर : इस्लामपूर-सांगली रस्त्यालगतच्या क्षीरसागर ओढ्याच्या रुंदीकरणाचे काम जलसंधारण विभागाच्या वतीने सुरू करण्यात आले. जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी ओढ्याची पाहणी करून काम करून देण्याचा शब्द दिला होता.
प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस अॅड. चिमण डांगे, शहराध्यक्ष शहाजी पाटील यांच्या हस्ते हे काम सुरू करण्यात आले. यावेळी युवा नेते संदीप पाटील, संदीप माने, बाळासाहेब कोळेकर, रामचंद्र चव्हाण, श्रीकांत गंगणमाले, नाना क्षीरसागर उपस्थित होते.
इस्लामपूरपासून काही अंतरावर असणाऱ्या लोणारी समाजाच्या घरांशेजारी हा क्षीरसागर ओढा आहे. पावसाळ्यामध्ये या ओढ्याचे पाणी म्हैशींचे गोठे व घरात घुसले होते तसेच या ओढ्याच्या पाण्याने या परिसरातील सातशे एकरच्यावर जमीन पूर्ण बाधित होत होती.
फोटो -१००२२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर ओढा न्यूज
इस्लामपूर येथील क्षीरसागर ओढ्याच्या रुंदीकरण कामाचा प्रारंभ प्रांताधिकारी नागेश पाटील, तहसीलदार रवींद्र सबनीस, अॅड. चिमण डांगे, शहाजी पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला.