पतीच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:28 AM2021-05-08T04:28:16+5:302021-05-08T04:28:16+5:30

याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधवी जाधव यांना सासू व पती माहेरकडून पैसे आणण्यासाठी त्रास देत हाेते. ...

Wife commits suicide due to immoral relationship of husband | पतीच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीची आत्महत्या

पतीच्या अनैतिक संबंधामुळे पत्नीची आत्महत्या

googlenewsNext

याबाबत कवठेमहांकाळ पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, माधवी जाधव यांना सासू व पती माहेरकडून पैसे आणण्यासाठी त्रास देत हाेते. माधवी यांना सासू व पती धनाजी यांच्याकडून वारंवार मारहाण होत होती. याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांत या आधीही माधवी यांनी त्याच्याविरोधात अर्ज दिला होता. तसेच सांगली येथील महिला कक्षात तक्रारी अर्ज दिला होता. यापूर्वी माधवी यांना चार वेळा जीवे मारण्याचा प्रयत्न सासू व पती यांनी केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

परंतु सासू व पती यांचा जाच काही थांबला नाही. शिवाय पती धनाजी याचे शेजारील एका मुलीशी प्रेमसंबंध होते. त्यामुळे सर्व गोष्टींना माधवी वैतागल्या होत्या. अखेर शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास घरातील सगळे झोपले असताना लोखंडी पाइपाला दोरीने गळफास लाऊन घेऊन आत्महत्या केली.

घटनेची माहिती मिळताच कवठेमहांकाळचे पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे यांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा केला. पती धनाजी जाधव याला ताब्यात घेतले. जतचे विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांनी कवठेमहांकाळ येथील उपजिल्हा रुग्णालयात येऊन घटनेची माहिती घेतली.

अधिक तपास कवठेमहांकाळ पोलीस करत आहेत.

Web Title: Wife commits suicide due to immoral relationship of husband

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.