Sangli Crime: चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगडी वरवंटा घालून पत्नीचा खून
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2025 13:01 IST2025-04-05T13:01:04+5:302025-04-05T13:01:38+5:30
जत : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून रेवनाळ (ता.जत) येथे पत्नी रुक्मिणी विलास खांडेकर (वय ३५) हिचा डोक्यात दगडी वरवंटा घालून ...

Sangli Crime: चारित्र्याच्या संशयावरून डोक्यात दगडी वरवंटा घालून पत्नीचा खून
जत : पत्नीच्या चारित्र्याच्या संशयावरून रेवनाळ (ता.जत) येथे पत्नी रुक्मिणी विलास खांडेकर (वय ३५) हिचा डोक्यात दगडी वरवंटा घालून खून केल्याची घटना घडली. संशयित विलास विठोबा खांडेकर यास जत पोलिसांनी अटक केली आहे.
दि. २ एप्रिल रोजी बिरा ऊर्फ आरोपी विलास खांडेकर हा दारू करून आला, त्यावेळी त्याच्या पत्नीने तुम्ही रोज दारू पिऊन का येता असे विचारले असता त्याने तुझ्या माहेरचे लोक सारखे माझ्या घरी का येतात? त्यांना घर नाही का? असे म्हणून शिवीगाळ केली, त्यावर पत्नीने त्यांना माझ्या माहेरच्या लोकांना का शिवीगाळी करता म्हणून विचारले तसेच तिच्या चारित्र्याच्या संशयावरून त्यांच्यात भांडण झाले होते.
तसेच विलास खांडेकर याने आज मी तुला जिवंत ठेवीत नाही अशी धमकी दिली. रात्री घरातील सर्वजण झोपल्यानंतर पत्नीच्या डोक्यात विलास खांडेकर याने घरातील दगडी वरवंटा पत्नीच्या डोक्यात घातला. शेजाऱ्यांनी तिला सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता तिचे दि. ३ एप्रिल रोजी गुरुवारी दुपारी निधन झाले. या घटनेची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली आहे.
फॉरेन्सिक टीमकडून पाहणी
घटनास्थळी पोलिसांनी फॉरेन्सिक टीम बोलावून पाहणी केली, तर उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील साळुंखे व पोलिस निरीक्षक कोळेकर यांनी घटनास्थळी भेट दिली. याप्रकरणी जत पोलिस ठाण्यात मयताचा भाऊ विलास बापू सरगर (रा. कोळे, ता. सांगोला, जि. सोलापूर) यांने फिर्याद दिली आहे. अधिक तपास जत पोलिस करीत आहेत.