Sangli Crime: चारित्र्याच्या संशयातून विट्यात पत्नीचा खून, मुले झाली पोरकी; पतीस अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2023 04:19 PM2023-03-03T16:19:59+5:302023-03-03T16:20:22+5:30

‘तू सारे काही खरे सांग, नाही तर जिवंतच ठेवत नाही’

Wife's murder due to suspicion of character in vita Sangli, Husband arrested | Sangli Crime: चारित्र्याच्या संशयातून विट्यात पत्नीचा खून, मुले झाली पोरकी; पतीस अटक

Sangli Crime: चारित्र्याच्या संशयातून विट्यात पत्नीचा खून, मुले झाली पोरकी; पतीस अटक

googlenewsNext

विटा : चारित्र्याच्या संशयावरून एकाने पत्नीच्या डोक्यात लोखंडी खोरे घालून खून केला. भाग्यश्री सिद्धाप्पा शिवगोंड (वय २५) असे मयत महिलेचे नाव आहे. विटा पोलिसांनी पती सिद्धाप्पा भिमाप्पा शिवगोंड (वय ३०, रा. शेगुणशी, ता. बबलेश्वर, जि. विजयपूर, सध्या रा. जुना वासुंबे रस्ता, विटा) याला अटक केली.

खुनाची घटना गुरुवारी दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास वासुंबे रस्त्यावरील तलावाजवळ घडली. यासंदर्भात सिद्धाप्पाचा शेजारी सुदीप बसवराज बन्नटे (रा. बसवन्न, ता. बागेवाडी, जि. विजयपूर) यांनी पोलिसात फिर्याद दिली. शिवगोंड पती-पत्नी सुमारे सहा वर्षांपूर्वी विटा येथे रोजगारासाठी आले  होते. जुना वासुंबे रस्त्यावर तलावाकाठी झोपडीवजा घरात अन्य मजुरांसोबत वस्तीवर राहायचे. त्यांना तीन मुले आहेत. पती-पत्नी मिळेल ते काम करुन उदरनिर्वाह करत होते.

काही महिन्यांपासून सिद्धाप्पा भाग्यश्रीच्या चारित्र्याविषयी शंका घेऊ लागला होता. तिचे अन्य कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेत होता.  यातून त्यांच्यात सतत वादही होत असत. वस्तीवरील शेजाऱ्यांनी यापूर्वी काहीवेळा वाद मिटवला होता. गुरुवारी दुपारी दोघेही घरातच होते. तेथे त्यांच्यात पुन्हा जोराचा वाद झाला.

‘तू सारे काही खरे सांग, नाही तर जिवंतच ठेवत नाही’, असे सिद्धाप्पाने धमकावले. शिवीगाळ करत लोखंडी खोऱ्याच्या तुंब्याने भाग्यश्रीच्या डोक्यात वार केले. पाच ते सहा जोरदार वार झाल्याने ती गंभीर जखमी झाली. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाला. तेथे उपस्थित सुदीप यांनी भाग्यश्रीला उपचारासाठी विटा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले, पण उपचार होण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाला.

सुदीपने वर्दी दिल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घरातून सिद्धाप्पाला ताब्यात घेतले. रात्री अटक केली. ग्रामीण रुग्णालयातच भाग्यश्रीच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी झाली. उपनिरीक्षक जालिंदर जाधव पुढील तपास करीत आहेत.

मुले पोरकी

सिद्धाप्पा आणि भाग्यश्री यांना तीन मुले आहेत. आईचा मृत्यू आणि वडील पोलिसांच्या ताब्यात यामुळे तिन्ही मुले उघड्यावर पडली आहेत. वस्तीवरील शेजाऱ्यांनी मुलांना धीर दिला.

Web Title: Wife's murder due to suspicion of character in vita Sangli, Husband arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.