आष्ट्यात विकासाला गती देणार : प्रतीक पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:28 AM2021-03-23T04:28:42+5:302021-03-23T04:28:42+5:30
फोटो ओळ : आष्टा येथे रस्ता कामाचे उद्घाटन प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, ...
फोटो ओळ : आष्टा येथे रस्ता कामाचे उद्घाटन प्रतीक पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी नगराध्यक्षा स्नेहा माळी, प्रतिभा पेटारे, झुंझारराव पाटील, दिलीपराव वग्याणी, विराज शिंदे, संग्राम फडतरे, माणिक शेळके, प्रकाश रुकडे, आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : पालकमंत्री जयंत पाटील यांनी आष्टा शहरातील विकासकामांसाठी पाच कोटी रुपयांचा विशेष निधी दिला आहे. या निधीतून शहरातील विकासकामे विशेषतः रस्ते व राम मंदिर येथील बाग-बगीचा विकसित करू, असा विश्वास युवा नेते प्रतीक पाटील यांनी व्यक्त केला.
आष्टा शहरातील विविध भागांतील १५ रस्त्यांच्या कामांचा, तसेच राम मंदिर येथील बाग-बगीच्या कामाचा प्रारंभ प्रतीक पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. नगराध्यक्षा स्नेहा माळी, उपनगराध्यक्षा प्रतिभा पेटारे, दिलीपराव वग्याणी, झुंझारराव पाटील, विराज शिंदे, माणिक शेळके, संग्राम फडतरे प्रमुख उपस्थित होते.
प्रतीक पाटील म्हणाले, पालकमंत्री जयंत पाटील यांनी आष्टा व इस्लामपूर शहरात संपर्क दौरा करून नागरिकांच्या मागण्या जाणून घेतल्या. आता या दोन्ही शहरांच्या विकासासाठी प्रत्येकी पाच कोटींचा निधी दिला आहे. या निधीतून दर्जेदार कामे पूर्ण करू आणि भविष्यात उर्वरित कामांनाही निधी दिला जाईल.
यावेळी प्रकाश रुकडे, धैर्यशील शिंदे, अर्जुन माने, पुष्पलता माळी, मनीषा जाधव, रुक्मिणी अवघडे, विकास बोरकर, शिवाजी चोरमुले, रघुनाथ जाधव, बाबा सिध्द, अनिल पाटील उपस्थित होते.