सहकार टिकविण्यासाठी सहकारी संस्थांना मदत करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:26 AM2021-03-26T04:26:46+5:302021-03-26T04:26:46+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क वांगी : राज्यातील सहकार टिकविण्यासाठी राज्य सरकार येणाऱ्या काळात सहकारी संस्थांना मदत करणार आहे, असे प्रतिपादन ...
लोकमत न्यूज नेटवर्क
वांगी : राज्यातील सहकार टिकविण्यासाठी राज्य सरकार येणाऱ्या काळात सहकारी संस्थांना मदत करणार आहे, असे प्रतिपादन कृषी व सहकार राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी केले.
वांगी (ता. कडेगाव) येथील डॉ. पतंगराव कदम सोनहिरा सहकारी साखर कारखान्याच्या ऑनलाईन २७ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते. सभेच्या अध्यक्षस्थानी कारखान्याचे अध्यक्ष आ. मोहनराव कदम होते.
यावेळी उपाध्यक्ष पोपटराव महिंद, संचालक रघुनाथ कदम, निवृत्ती जगदाळे, बापूसाहेब पाटील, पी. सी. जाधव, दिलीपराव सूर्यवंशी, कार्यकारी संचालक शरद कदम उपस्थित होते.
विश्वजित कदम म्हणाले की, कारखान्याने हंगामात उसाला उच्चांकी दर दिला आहे. कारखान्याचे विस्तारीकरण करण्यात येणार असून, डिस्टिलरी प्रकल्पाची क्षमता ६० हजार लिटर प्रतिदिन असून, ती एक लाख लिटर प्रतिदिन करण्यात येणार आहे. सहवीज निर्मिती प्रकल्प २२ मेगावॅट असून, तो ३४ मेगावॅट करण्यात येणार आहे. गाळप क्षमता ७,५०० टन प्रतिदिन करण्यात येणार आहे.
आ. मोहनराव कदम यांच्या हस्ते पार्वती परशुराम गोरे (कडेगाव), प्रकाश शंकराव कदम (खेराडेवांगी, येतगाव), दत्तात्रय शंकर ननवरे (येवलेवाडी), नितीन शामराव सूर्यवंशी (वांगी), जनार्दन सोना यादव उपाळे (वांगी) यांना डॉ. पतंगराव कदम ऊसभूषण पुरस्कार देण्यात आला.
युवराज कदम, सयाजी धनवडे, पुरुषोत्तम भोसले, लक्ष्मण पोळ, पंढरीनाथ घाडगे, तानाजीराव शिंदे, जालिंदर महाडिक उपस्थित होते.