पाण्याच्या मुद्द्यावर राजकारण खपवून घेणार नाही : संजयकाका पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2018 09:31 PM2018-06-15T21:31:58+5:302018-06-15T21:31:58+5:30
कृष्णा खोरे महामंडळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे मंडळाच्या अभियंत्यांनी समाजाप्रती जाणीव ठेवून कामे करावीत. जनतेच्या भल्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून योग्यप्रकारे गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर
सांगली : कृष्णा खोरे महामंडळ शेतकऱ्यांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे. त्यामुळे मंडळाच्या अभियंत्यांनी समाजाप्रती जाणीव ठेवून कामे करावीत. जनतेच्या भल्यासाठी नावीन्यपूर्ण कल्पना राबवून योग्यप्रकारे गुणवत्तापूर्ण काम करण्यावर भर द्यावा, असे आवाहन कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष खासदार संजयकाका पाटील यांनी शनिवारी केले. पाण्याच्या मुद्द्यावर कोणी राजकारण करीत असल्यास ते येथून पुढे खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
पुणे येथे सिंचन भवनमध्ये पदभार स्वीकारल्यानंतर आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीला महामंडळाचे कार्यकारी संचालक ख. ह. अन्सारी, मुख्य अभियंता ता. ना. मुंडे, वि. ग. राजपूत, सौ. वा. अ. अंकुश, तसेच महामंडळाच्या अखत्यारीतील विविध प्रकल्पांचे कार्यकारी अभियंता, सर्व खात्यांचे प्रमुख उपस्थित होते.खा. पाटील म्हणाले की, शेतकºयांना पाणी वेळेत उपलब्ध करून देणे हे आपले प्रमुख कार्य आहे. गावातील तलाठी, ग्रामसेवक तसेच अन्य सर्वांना बरोबर घेऊन, समस्या सोडविण्यास प्राधान्य राहील. पाण्याच्या मुद्यावर कोणी राजकारण करीत असल्यास ते येथून पुढे खपवून घेतले जाणार नाही. आगामी कालावधीमध्ये जिल्हा तसेच प्रकल्पनिहाय आढावा घेऊन महामंडळातर्फे लवकरच जलसंपदामंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यासमोर एक विस्तृत सादरीकरण करणार असल्याचे खा. पाटील यांनी सांगितले.
पुणे येथील सिंचन भवनमध्ये कृष्णा खोरे महामंडळाची आढावा बैठक झाली. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष खा. संजयकाका पाटील यांनी अधिकाºयांना मार्गदर्शन केले. महामंडळाचे कार्यकारी संचालक ख. ह. अन्सारी, मुख्य अभियंता ता. ना. मुंडे, वि. ग. राजपूत यांच्यासह अधिकारी उपस्थित होते.