मिरजेतील प्रलंबित समस्या सोडविणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:27 AM2021-03-05T04:27:00+5:302021-03-05T04:27:00+5:30
शहरातील भाजी मंडई, रस्ते रुंदीकरण, अतिक्रमण, ड्रेनेज व्यवस्था यासह मिरजेतील सर्व समस्यांची पूर्ण माहिती घेऊन अधिकारी व सदस्यांसोबत चर्चा ...
शहरातील भाजी मंडई, रस्ते रुंदीकरण, अतिक्रमण, ड्रेनेज व्यवस्था यासह मिरजेतील सर्व समस्यांची पूर्ण माहिती घेऊन अधिकारी व सदस्यांसोबत चर्चा करून समस्या सोडविण्याचे आश्वासन दिले. दर आठवड्यात किमान एक दिवस मिरज कार्यालयात उपस्थित राहणार असल्याचेही महापौरांनी सांगितले.
नूतन महापौर मिरज कार्यालयाच्या पहिल्या भेटीत मिरजेच्या समस्या सोडविण्याचे नेहमीच आश्वासन देतात. मात्र, आजवर या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने नूतन महापौर मिरजेतील समस्या कधी सोडविणार याकडे सर्वाचे लक्ष आहे.
उपायुक्त स्मृती पाटील यांनी स्वागत केले. नगरसेवक निरंजन आवटी, संगीता हारगे, करण जामदार, सहाय्यक आयुक्त दिलीप घोरपडे, मोहन वाटवे, डॉ. विनोद परमशेट्टी यांच्यासह मनपातील विभागप्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.