वंचित समाजाला संघटित करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 14, 2021 04:30 AM2021-07-14T04:30:29+5:302021-07-14T04:30:29+5:30
सांगली : वंचित घटकांना संघटित करुन वंचित बहुजन आघाडी बळकट करणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय दौरे करणार ...
सांगली : वंचित घटकांना संघटित करुन वंचित बहुजन आघाडी बळकट करणार आहे. त्यादृष्टीने जिल्ह्यातील प्रत्येक तालुकानिहाय दौरे करणार आहे, असे प्रतिपादन वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष महावीर कांबळे यांनी केले.
काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील सांगली, मिरजेतील कार्यकर्त्यांनी वंचित बहुजन आघाडीत प्रवेश केला. यावेळी महावीर कांबळे बोलत होते. ते म्हणाले, सध्या मराठा आरक्षण, मुस्लिम आरक्षण, धार्मिक प्रतीके गैरवापर प्रतिबंध कायदा, ओबीसी आरक्षण, एससी व एसटी पदोन्नती आरक्षणाच्या प्रश्नावर वंचित बहुजन आघाडीने राज्यभर आंदोलने केली होती. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते ॲड. प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली संघटन बांधणी केली जात आहे. सांगली जिल्ह्यातही सर्व तालुकानिहाय दौरे करुन संघटना मजबूत करणार आहे. तसेच वंचित समाजावरील अन्यायालाही वाचा फोडणार आहे.
यावेळी सांगली जिल्हा महासचिव उमरफरुक ककमरी, उपाध्यक्ष चंद्रकांत खरात, गौतम लोटे, मनोहर कांबळे, संजय कांबळे, शेखर पावसे, सनी गायकवाड, केतन माने, प्रशांत वाघमारे, अनिल अंकलखोपे, वसंत भोसले, पृथ्वीराज कांबळे, प्रशांत कदम, रवींद्र विभुते, विक्रम कोलप, सिध्दार्थ कांबळे, लक्ष्मण देवकर, वसंत गाडे, शीतल कोलप, मधुकर कोलप, हिरामण भगत, सागर आवळे, ऋषिकेश माने, आदी उपस्थित होते.