महाराष्ट्र केसरीचे मैदान जिंका, हत्तीवरून मिरवणूक काढू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:11+5:302021-03-09T04:30:11+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क विटा : लोकनेते हणमंतराव पाटील यांनी विट्यात तालीम सुरू केली. त्यांचा वारसा घेऊन सदाशिवराव पाटील यांनी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
विटा : लोकनेते हणमंतराव पाटील यांनी विट्यात तालीम सुरू केली. त्यांचा वारसा घेऊन सदाशिवराव पाटील यांनी आमदार असताना खानापूर तालुका क्रीडा संकुल उभे केले. त्यामध्येच आदर्श कुस्ती केंद्र सुरू झाले असून, येथील मल्लांनी महाराष्ट्र केसरीचे कुस्ती मैदान जिंकावे. त्यांची हत्तीवरून मिरवणूक काढू, असे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले.
येथील आदर्श कुस्ती केंद्राचा मल्ल सागर सूर्यवंशी, मिलिंद मासाळ आणि सागर तामखडे यांची महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी पै. बापूराव निकम, पै. मधुकर कांबळे, पै. अभिजित मोरे, प्रताप मोरे, अविनाश चोथे, रोहित पाटील उपस्थित होते.
वैभव पाटील म्हणाले, आदर्श कुस्ती केंद्राचा शड्डू आम्ही परिसरातील कुस्ती मैदानात घुमवत होतो. परंतु, मधल्या काळात तांत्रिक अडचणीमुळे तालीम बंद राहिली. आता गेल्या सात महिन्यापासून विट्यातील अभिजित मोरे यांनी पुन्हा आदर्श कुस्ती केंद्र दिमाखात सुरू केले आहे.
अॅड. राहुल मंडले यांनी प्रास्ताविक केले. विद्याधर मदने यांनी आभार मानले.
चौकट :
हिंदकेसरीच होणार
लाल मातीतील कुस्तीचे मैदान आमचे पहिलवान जिंकणार आहेत. परंतु, आगामी काळात राजकारणातील मैदान जिंकून मी हिंदकेसरीच होणार असल्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सांगितले.