राज्य स्पर्धेतील विजेत्या मल्लांना मिळणार आता भरीव मानधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 12, 2021 04:26 AM2021-05-12T04:26:55+5:302021-05-12T04:26:55+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क बुधगाव : राज्य कुस्ती स्पर्धेतील चार प्रमुख विभागातील प्रत्येक गटातील चार मल्लांना मिळणाऱ्या वार्षिक मानधनात राज्य ...

The winners of the state competition will now get a hefty honorarium | राज्य स्पर्धेतील विजेत्या मल्लांना मिळणार आता भरीव मानधन

राज्य स्पर्धेतील विजेत्या मल्लांना मिळणार आता भरीव मानधन

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

बुधगाव : राज्य कुस्ती स्पर्धेतील चार प्रमुख विभागातील प्रत्येक गटातील चार मल्लांना मिळणाऱ्या वार्षिक मानधनात राज्य सरकारने भरीव वाढ केली आहे. राज्य सरकारने ७ मे रोजी यासंबंधी अधिसूचना काढली आहे. या निर्णयाचे कुस्ती क्षेत्राने जोरदार स्वागत केले आहे. दुसरीकडे सुधारित आदेशानुसार राज्य स्पर्धेतील सहभागी मल्लांना मात्र मानधनातून वगळण्यात आले आहे. यामुळे नाराजी व्यक्त हाेत असून विजेत्या मल्लांबराेबर स्पर्धेत सहभागी मल्लांनाही पूर्ववत मानधन सुरू करावे, अशी अपेक्षा व्यक्त हाेत आहे.

महाराष्ट्रात १९९४ पासून प्रावीण्यप्राप्त मल्लांना वार्षिक मानधन देण्यात येते. मल्लांच्या मानधन वाढीसाठी २०१२ पासून राज्य कुस्तीगीर परिषदेने राज्य सरकारकडे पाठपुरावा सुरू ठेवला होता. दरम्यान, जागतिक कुस्ती संघटनेने केलेल्या वजनी गटातील बदलांमुळे यामध्ये अडथळे येत होते. यामध्ये सुधारणा करण्यात आली. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार, कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते, सरचिटणीस बाळासाहेब लांडगे यांनी याप्रश्नी सातत्याने पाठपुरावा केला. वरिष्ठ माती व गादी, ग्रीको रोमन, कुमार (उदयोन्मुख) व महिला या विभागातील प्रत्येकी दहा वजनी गटातील राज्य स्पर्धेतील पहिल्या चार प्रावीण्यप्राप्त मल्लांना हे मानधन मिळणार आहे.

चाैकट

सुधारित निर्णयानुसार मिळणारे मानधन व कंसात पूर्वी मिळणारे मानधन

वरिष्ठ (महाराष्ट्र केसरी) माती व गादी विभाग

प्रथम : ६० हजार रुपये (२८,८०० रुपये),

दि्वतीय : ५५ हजार रुपये (२६,४०० रुपये),

तृतीय व चतुर्थ : ५० हजार रुपये (२४,००० रुपये),

कुमार (उदयोन्मुख) विभाग

प्रथम : ५० हजार रुपये (२४,००० रुपये),

दि्वतीय : ३६ हजार रुपये (१८,००० रुपये),

तृतीय व चतुर्थ : २४ हजार रुपये (१२,००० रुपये),

महिला विभाग

प्रथम : ६० हजार रुपये (२८,८०० रुपये),

दि्वतीय : ५० हजार रुपये (२४,००० रुपये),

तृृृृतीय : ३६ हजार रुपये (१८,००० रुपये).

ग्रीको रोमन विभाग

प्रथम : ६० हजार रुपये,

दि्वतीय : ५५ हजार रुपये,

तृतीय व चतुर्थ : ५० हजार रुपये,

काेट

माती व गादी विभागात यापूर्वी पहिल्या सहा जणांसह स्पर्धेतील सहभागींनाही मानधन मिळत होते. कुमार विभागातही सहभागींना मानधन दिले जात होते. मात्र सुधारित निर्णयानुसार स्पर्धेतील सहभागींना यातून वगळण्यात आले आहे, तर ग्रीको रोमन विभागाचा यामध्ये प्रथमच समावेश करण्यात आला आहे. कुस्तीची परंपरा टिकविण्याचे काम महाराष्ट्राने आजपर्यंत परिश्रमपूर्वक केले आहे. राज्य सरकारने कुस्तीपटूंच्या मानधनात केलेली वाढ निश्चितच स्वागतार्ह आहे. बाकी राहिलेल्या उणिवाही सरकारकडून त्वरित दूर केल्या जातील, अशी अपेक्षा आहे.

- उत्तमराव पाटील,

आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षक, कवलापूर (सांगली)

काेट

बऱ्याच वर्षांपासून प्रलंबित राहिलेला मल्लांच्या वाढीव मानधनाचा प्रश्न मार्गी लावण्यात राज्य कुस्तीगीर परिषदेला यश आले आहे. राज्य कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष शरद पवार यांनी याप्रश्नी विशेष लक्ष घातले होते. कुस्ती संवर्धनासाठी आवश्यक असलेल्या निर्णयाबद्दल सरकारचे कुस्ती क्षेत्रातील सर्वांकडून अभिनंदन.

- नामदेवराव मोहिते, कार्याध्यक्ष, महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद

चाैकट

सहभागींनाही मानधन मिळालेच पाहिजे..

मुळात कुस्तीगीर हा गरीब कुटुंबातूनच येत असतो. प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत हा पेशा जतन करण्याचे काम तो करीत असतो. कुस्तीत सहभागींचेही मोठे महत्त्व असते. त्यामुळे सहभागींना आतापर्यंत मिळणाऱ्या मानधनाप्रमाणे यापुढेहीही मानधन मिळाले पाहिजे. अन्यथा विजेत्या मल्लांच्या या भरीव मानधन वाढीनंतरही नकारात्मक संदेश कुस्तीगीरांमध्ये जाऊन, पुन्हा कुस्ती संवर्धनाच्या प्रयत्नांना खीळ बसण्याचा धोका उद्भवू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.

Web Title: The winners of the state competition will now get a hefty honorarium

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.