कोविडमुळे अनुपस्थित विद्यार्थ्यांसाठी हिवाळ्यात परीक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 04:19 AM2021-06-11T04:19:07+5:302021-06-11T04:19:07+5:30
सांगली : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील परीक्षा येत्या १० जूनपासून सुरू होत आहेत. या लेखी परीक्षेच्या ...
सांगली : आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या २०२०-२१ या शैक्षणिक वर्षातील परीक्षा येत्या १० जूनपासून सुरू होत आहेत. या लेखी परीक्षेच्या कालावधीत कोरोनाबाधित होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हिवाळ्यात स्वतंत्र परीक्षा घेतली जाणार आहे. विद्यार्थी परिषदेने यासाठी पाठपुरावा केला होता.
परिषदेने प्रसिद्धीपत्रकाद्वारे माहिती दिली की, कोरोनामुळे जे परीक्षार्थी अनुपस्थित राहतील, त्यांच्यासाठी हिवाळ्यात लेखी व प्रात्यक्षिक परीक्षा झाल्यानंतर विशेष परीक्षा घेण्यात येईल.
कोविडच्या पार्श्वभूमीवर वैद्यकीय परीक्षेस बसणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणींसंदर्भात विद्यार्थी परिषदेचे सदस्य वैद्यकीय शिक्षणमंत्री अमित देशमुख यांना भेटले. तसेच विद्यापीठाचे कुलसचिव व परीक्षा नियंत्रकांकडेही निवेदने दिली होती. त्यांची दखल घेत शासनाने पुनर्परीक्षेचा निर्णय घेतला. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. या विशेष परीक्षेचे वेळापत्रक लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी परिषदेने केली आहे.