Sangli: नेवरीत कौटुंबिक वादातून महिलेचा खून; पती गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 1, 2024 02:26 PM2024-01-01T14:26:31+5:302024-01-01T14:28:44+5:30

पती गंभीर : सासू, दीर जावेसह चौघेजण ताब्यात

Woman killed over family dispute in Nevrit Sangli; Husband seriously injured | Sangli: नेवरीत कौटुंबिक वादातून महिलेचा खून; पती गंभीर जखमी

Sangli: नेवरीत कौटुंबिक वादातून महिलेचा खून; पती गंभीर जखमी

कडेगांव : नेवरी (ता. कडेगाव) येथे महिलेचे डोके दगडाने ठेचून, गळ्यावर, डोक्यात धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. महिलेचा पती व चुलत दीरावरही वार केल्याने तेही गंभीर जखमी झाले. प्रियांका अजय महाडिक (वय २५) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

अजय आप्पासाहेब महाडिक (३०) व नवनाथ बाबूराव महाडिक (४५) अशी जखमींची नावे आहेत. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली. अजय यास विटा येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबत कडेगाव पोलिसांत नोंद झाली आहे.

याप्रकरणी महिलेची सासू तारामती आप्पासाहेब महाडिक, दीर शरद आप्पासाहेब महाडीक, जाऊ उज्ज्वला शरद महाडीक, पुतण्या अभिषेक शरद महाडिक या संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

नेवरी येथे शेडवस्तीनजीक महाडीक कुटुंब राहते. शरद व अजय हे सख्खे भाऊ आहेत. शरदचा मुंबई येथे रिक्षाचा व्यवसाय आहे. तो पंधरा दिवसांपूर्वी नेवरी येथे आला आहे शनिवारी सायंकाळी दोन्ही कुटुंबांत भांडण सुरू झाले. रागाच्या भरात दीर शरद आणि पुतण्या अभिषेक याने धारदार शस्त्राने प्रियांकाच्या डोक्यावर व गळ्यावर तसेच तिचा पती अजयच्याही डोक्यावर वार केले. त्यामुळे प्रियांकाचा जागीच मृत्यू झाला, तर भांडण सोडविण्यासाठी गेलेल्या मयत महिलेचा चुलत दीर नवनाथ महाडिक जखमी झाला. त्यास स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Web Title: Woman killed over family dispute in Nevrit Sangli; Husband seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.