खेड रस्त्यावर अपघातात महिला ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 23, 2020 04:24 AM2020-12-23T04:24:04+5:302020-12-23T04:24:04+5:30
इस्लामपूर : येथील खेड रस्त्यावरील कचरा डेपो परिसरात रिक्षा आणि मालवाहू टेम्पाेची धडक होऊन झालेल्या अपघातात महिला जागीच ठार ...
इस्लामपूर : येथील खेड रस्त्यावरील कचरा डेपो परिसरात रिक्षा आणि मालवाहू टेम्पाेची धडक होऊन झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली, तर रिक्षाचालकासह अन्य एक महिला गंभीर जखमी झाली. हा अपघात मंगळवारी दुपारी दोन वाजता घडला. सुमन गंगाराम शिंदे (वय ५५, रा. रेठरेहरणाक्ष) असे मृत महिलेचे नाव आहे. तिच्यासोबतची लक्ष्मी अवधूत चव्हाण ही महिला आणि रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत शिवाजी शामराव शिंदे यांनी पोलिसात फिर्याद दिली असून, टेम्पाे चालक युनुस महंमद पठाण (३६, रा. दुधोंडी, ता. पलूस) याच्याविरुद्ध मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सुमन शिंदे या अन्य एका महिलेसोबत रिक्षातून गाताडवाडी येथील भावजयीस भेटण्यासाठी निघाल्या होत्या. खेड रस्त्यावरील कचरा डेपो परिसरात त्या आल्यावर, त्यांच्या रिक्षाला भरधाव मालवाहु टेम्पोची (क्र. एमएच ०६ एफडी ३५९३) जोरदार धडक बसली. या धडकेमध्ये सुमन शिंदे या जागीच ठार झाल्या, तर जखमी इतर दोघांना परिसरातील नागरिकांनी उपचारासाठी रुग्णालयात पाठविले.