Sangli: फाळकेवाडीत महिला सरपंचाला काठीने मारहाण, परस्परविरोधी फिर्यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 04:32 PM2023-11-29T16:32:26+5:302023-11-29T16:32:47+5:30

आष्टा : फाळकेवाडी ता. वाळवा येथे वादग्रस्त बांधकामाबाबत ग्रामपंचायती मध्ये मीटिंग बोलवल्याच्या रागातून सरपंचाच्या पतीसह ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला लाथा ...

Woman sarpanch beaten with stick in Phalkewadi in Sangli | Sangli: फाळकेवाडीत महिला सरपंचाला काठीने मारहाण, परस्परविरोधी फिर्यादी

Sangli: फाळकेवाडीत महिला सरपंचाला काठीने मारहाण, परस्परविरोधी फिर्यादी

आष्टा : फाळकेवाडी ता. वाळवा येथे वादग्रस्त बांधकामाबाबत ग्रामपंचायती मध्ये मीटिंग बोलवल्याच्या रागातून सरपंचाच्या पतीसह ग्रामपंचायत सदस्याच्या पतीला लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करण्यात आली. तसेच सरपंच व सदस्यांना शिवीगाळ करण्यात आली. ही घटना मंगळवारी (दि. २८) फाळकेवाडी एसटी स्टँड जवळ घडली. मारहाणीबाबत आष्टा पोलीस ठाण्यात विपुलचंद व ऋषिकेश फाळके यांनी परस्परविरोधी फिर्याद दिली आहे.

विपुल बाबासाहेब चंद यांची पत्नी शुभांगी ही ग्रामपंचायत फाळकेवाडी ची सदस्य तर चुलत भाऊ विकास विठ्ठल चंद याची पत्नी प्राजक्ता चंद या विद्यमान लोकनियुक्त सरपंच आहेत फाळकेवाडी गावामध्ये संदीप विश्वनाथ आपुगडे यांचे वादग्रस्त बांधकाम सुरू आहे त्याबाबतचा तक्रार अर्ज ग्रामपंचायत मध्ये आला होता त्या अनुषंगाने ग्रामपंचायत मिटिंग बोलवण्यात आली होती सचिन काटकर यांनी विपुल यांना फोन करून ''काय रे विपुल तुला आणि तुझा भाऊ विकास तुम्हाला लय मस्ती आली आहे काय मीटिंग कशाला घेताय ग्रामपंचायतीकडे या तुम्हाला दाखवतो जिवंत ठेवत नाही'' अशी धमकी दिली होती

विपुल पत्नी शुभांगी व विकास सरपंच पत्नी प्राजक्ता यांना मोटरसायकलवर घेऊन ग्रामपंचायतीकडे जात असताना बस स्टॅन्ड जवळ आले असता सचिन काटकर याने विपुल याला पकडून गाडीवरून खाली ओढून लाथा बुक्क्यांनी मारहाण सुरू केली. तसेच तेथे असलेल्या विजय काटकर ,हर्षल काटकर, राहुल आदिनाथ काटकर, सागर फाळके व एका अनोळखी इसमाने विपुल व विकास यांना लाथा बुक्क्यांनी व काठीने मारहाण करून शिवीगाळ केली. यावेळी सागर फाळके यांनी विकासच्या डोक्यात काठी मारल्याने तो जखमी झाला यावेळी मोटरसायकल क्रमांक एम एच १० डी ४०२३ चे दहा हजारचे नुकसान केले. सचिन माने आणि सरपंच प्राजक्ता चंद, शुभांगी चंद भांडणे सोडवण्यास आले असता त्यांनाही शिवीगाळ करण्यात आला त्यानंतर सर्वजण निघून गेले.

दरम्यान ऋषिकेश उत्तम फाळके यांनीही विपुल,चंद, भास्कर चंद, विकास चंद, सचिन आपुगडे ,सचिन माने यांनीही वादग्रस्त बांधकामाच्या कारणावरून ऋषिकेश फाळके व राहुल काटकर यांना शिवीगाळ करून काठीने मारहाण केल्याची आष्टा पोलिसात फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश गायकवाड करीत आहेत

Web Title: Woman sarpanch beaten with stick in Phalkewadi in Sangli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.