किल्लेमच्छिंद्रगडला किरकोळ कारणातून महिलेचे डोके फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:29 AM2021-05-20T04:29:12+5:302021-05-20T04:29:12+5:30
इस्लामपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे शेतातील सरबांधाच्या हद्दीच्या कारणावरून झालेल्या वादात दगडाने एका महिलेचे डोके फोडण्याची घटना घडली. ...
इस्लामपूर : किल्लेमच्छिंद्रगड (ता. वाळवा) येथे शेतातील सरबांधाच्या हद्दीच्या कारणावरून झालेल्या वादात दगडाने एका महिलेचे डोके फोडण्याची घटना घडली. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास घडला. जखमी महिलेवर सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अर्जुन बाळासाहेब मदने (वय ३०) याने पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार आनंदा लक्ष्मण मदने, राजेंद्र आनंदा मदने, दीपक आनंदा मदने, मनीषा राजेंद्र मदने या चौघांविरुद्ध गुुन्हा नोंद झाला आहे. या दोन्ही कुटुंबात शेताच्या सरबांधाच्या हद्दीवरून वाद आहे. मंगळवारी सायंकाळी या चौघांनी संगनमत करून बाळासाहेब मदने यांच्या घरासमोर जाऊन शिवीगाळ व दमदाटी केली. त्यानंतर वाद वाढतच गेल्याने बाळासाहेब यांची बहीण श्रीमती सुनीता अरुण आडके भांडण सोडविण्यासाठी मध्ये आल्यावर राजेंद्र मदने याने दगडाने त्यांचे डोके फोडून जखमी केले. त्यानंतर बाळासाहेब मदने व इतरांना शिवीगाळ व दमदाटी केली.