महिला कार्यकर्त्यांनी पक्षबांधणी व सामाजिक कार्यात गती द्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:17 AM2021-07-23T04:17:02+5:302021-07-23T04:17:02+5:30

इस्लामपूर येथे महिला राष्ट्रवादीच्या ‘वक्तृत्व कार्यशाळेत’रोझा किणीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. दीपक कोठावळे, कॉ. विजय कुंभार, मनीषा पेठकर, ...

Women activists should give impetus to party formation and social work | महिला कार्यकर्त्यांनी पक्षबांधणी व सामाजिक कार्यात गती द्यावी

महिला कार्यकर्त्यांनी पक्षबांधणी व सामाजिक कार्यात गती द्यावी

Next

इस्लामपूर येथे महिला राष्ट्रवादीच्या ‘वक्तृत्व कार्यशाळेत’रोझा किणीकर यांनी मार्गदर्शन केले. यावेळी कॉ. दीपक कोठावळे, कॉ. विजय कुंभार, मनीषा पेठकर, शैलजा जाधव उपस्थित होत्या.

लोकमत न्यूज नेटवर्क

इस्लामपूर : महिला कार्यकर्त्यांनी चांगले बोलायला हवे. महिला कार्यकर्त्यांनी समाजातील छोट्या-मोठ्या कार्यक्रमात आपले मत प्रभावीपणे मांडत सार्वजनिक कार्यास, संघटना बांधणीस गती द्यावी, या उद्देशाने इस्लामपूर शहर महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने तीन दिवसांची कार्यशाळा घेण्यात आली.

युवा नेते प्रतीक पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त इस्लामपूर महिला राष्ट्रवादी काँग्रेसने वक्तृत्व कार्यशाळेचे आयोजन केले. या कार्यशाळेत शहराध्यक्षा रोझा किणीकर, कॉ. दीपक कोठावळे यांनी सभेत कसे बोलावे, याबद्दल मार्गदर्शन केले. कॉ. विजय कुंभार यांनी पक्ष संघटनेची मजबूत बांधणीबद्दल मार्गदर्शन केले. या कार्यशाळेच्या समारोपात महिला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्या मनीषा पेठकर, शैला जाधव, प्रतिभा पाटील, रुपाली पाटील यांच्यासह अनेक महिलांनी आपले विचार मांडले.

युवती शहराध्यक्षा प्रियांका साळुंखे हिने आभार मानले. सुनंदा साठे, सुप्रिया पेठकर, प्राजक्ता देसाई, ऋतुजा देसाई, दीप्ती थोरात यांच्यासह अनेक महिला, युवती या कार्यशाळेत सहभागी झाल्या होत्या.

Web Title: Women activists should give impetus to party formation and social work

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.