महिलांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 04:17 AM2021-07-03T04:17:40+5:302021-07-03T04:17:40+5:30

विटा : आज शेतीपूरक व्यवसायात महिला मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. महिलांनी शेतीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून गट शेतीला प्राधान्य ...

Women drive the rural economy | महिलांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

महिलांमुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेला चालना

Next

विटा : आज शेतीपूरक व्यवसायात महिला मोठ्या प्रमाणात काम करत आहेत. महिलांनी शेतीमध्ये बचत गटाच्या माध्यमातून गट शेतीला प्राधान्य द्यावे. नवनवीन तंत्राचा शेतीत वापर करावा. शासनाच्या विविध कृषी योजनांचा लाभ महिलांनी घेतला पाहिजे, कृषी क्षेत्रामध्ये महिलांचा मोठा सहभाग असल्यामुळेच ग्रामीण अर्थव्यवस्थेला आज चालना मिळाली आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष मालन मोहिते यांनी केले.

मोहित्यांचे वडगाव (ता. कडेगाव) येथे संगमेश्वर महिला समूहाच्यावतीने कृषी दिनानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात मोहिते बोलत होत्या. कृषी दिनाचे औचित्य साधून विविध प्रकारच्या वृक्षांचे रोपण तसेच औषधी वनस्पती, विविध फळभाज्यांची लागवड करण्यात आली. यावेळी मोहिते यांनी गावातील सर्व महिला बचत गटांना सोनहिरा महिला विकास प्रतिष्ठानकडून प्रतिव्यक्ती एक फळझाड देण्यात येईल, असे सांगितले. या कार्यक्रमाला संगमेश्वर महिला समूहाच्या अध्यक्ष संध्या मोहिते, सचिव मीनाताई पवार, सुवर्णा मोहिते, नीता लादे, सुजाता मोहिते, मनिषा मोहिते, प्रगती मोहिते, नीलम मोहिते, वंदना मोहिते, साक्षी मोहिते, अपर्णा मोहिते, सरपंच विजय मोहिते, प्रा. श्रीकृष्ण मोहिते, रामचंद्र मोहिते यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

फोटो : ०२०७२०२१-विटा-संगमेश्वर महिला

ओळ : मोहित्यांचे वडगाव येथे संगमेश्वर महिला समूहाच्यावतीने कृषी दिनानिमित्त वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मालन मोहिते, संध्या मोहिते, मीना पवार यांच्यासह महिला उपस्थित होत्या.

Web Title: Women drive the rural economy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.