महिलांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:31 AM2021-09-24T04:31:58+5:302021-09-24T04:31:58+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क मांगले : महिलांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करून ज्या-त्या वेळेस प्रतिकार केल्यास महिलांवरील अत्याचार कमी होतील. त्यासाठी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
मांगले : महिलांनी कायद्याचे ज्ञान आत्मसात करून ज्या-त्या वेळेस प्रतिकार केल्यास महिलांवरील अत्याचार कमी होतील. त्यासाठी महिलांनी निर्भीडपणे परिस्थितीला सामोरे जावे, असे आवाहन निवृत्त जिल्हा न्यायाधीश एस. एस. उपाध्ये यांनी येथे केले.
शिराळा तालुका विधी समिती, शिराळा वकील संघटना आणि मांगले ग्रामपंचायत यांच्यावतीने कायदेविषयक साक्षरता शिबिर आयोजित केले होते. यावेळी ते बोलत होते. ॲड. जी. एफ. पाटील यांनी कौटुंबिक हिंसाचारापासून महिला संरक्षण कायदा याविषयी मार्गदर्शन केले.
एस. एस. उपाध्ये म्हणाले, महिलांनी कायद्याचे ज्ञान घेतल्यास निश्चित बळ मिळते. मनातील भीती, दडपण निघून जाते व निर्भीड वातावरणात महिलांना वावरता येईल.
उपसरपंच धनाजी नरुटे यांनी स्वागत केले. एस. पी. यादव यांनी प्रास्ताविक केले. यावेळी प्रा. विजयकुमार जोखे, प्रा. भीमराव गराडे-पाटील, तालुका कृषी अधिकारी धनाजी थोरात यांनी मार्गदर्शन केले. सरपंच मीनाताई बेंद्रे, अरविंद माने, दिवाणी न्यायालयाचे सहअधीक्षक डी. डी. कुंभार, विस्तार अधिकारी मनोज जाधव उपस्थित होते.