स्त्रियांनी सावित्रीबाईंचा आदर्श घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2021 04:25 AM2021-03-18T04:25:45+5:302021-03-18T04:25:45+5:30
कुरळप : स्त्री शिक्षणाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली असून, त्यांना यासाठी सावित्रीबाई फुले यांची मोठी साथ ...
कुरळप : स्त्री शिक्षणाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांनी केली असून, त्यांना यासाठी सावित्रीबाई फुले यांची मोठी साथ लाभली. स्त्रियांनी सावित्रीबाईंचे केवळ क्रांतिज्योती म्हणून कौतुक करण्याऐवजी स्वत: पुढील पिढ्यांसाठी क्रांतिज्योती व्हावे, असे मत प्रा. डॉ. प्रदीप कांबळे व्यक्त केले. ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा शिक्षण संकुलात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली, यावेळी कांबळे बोलत होते.
कांबळे म्हणाले, स्त्री शिक्षणाची क्रांतिज्योत सावित्रीबाई फुले यांनी लावली. त्यांनी लावलेल्या रोपट्याचे आज विराट वृक्षात रूपांतर झाले आहे. स्त्रियांनी शिक्षण घेऊन समाजाची उन्नती करून समाजाला शिक्षित करावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी स्नेहल वायदंडे, पूजा शेळके, निकिता वायदंडे या विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. अंकुश कुरणे यांनी सूत्रसंचालन केले तर ऋतुजा वायदंडे हिने आभार मानले.