महिलांनी एकमेकींना सहकार्य करीत प्रगती साधावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2021 04:24 AM2021-01-21T04:24:58+5:302021-01-21T04:24:58+5:30

इस्लामपूर : महिलांनी एकमेकींना समजून घेत, मैत्री वाढवीत, सहकार्याचा हात दिला, तर प्रगतीस अधिक गती येईल, असा विश्वास इस्लामपूरच्या ...

Women should make progress by cooperating with each other | महिलांनी एकमेकींना सहकार्य करीत प्रगती साधावी

महिलांनी एकमेकींना सहकार्य करीत प्रगती साधावी

Next

इस्लामपूर : महिलांनी एकमेकींना समजून घेत, मैत्री वाढवीत, सहकार्याचा हात दिला, तर प्रगतीस अधिक गती येईल, असा विश्वास इस्लामपूरच्या बांधकाम सभापती सुनीता सपकाळ यांनी बुधवारी व्यक्त केला.

येथील राष्ट्रवादी भवनमध्ये शहर महिला राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार, हळदी-कुंकू व समाजप्रबोधन व्याख्यान समारंभात त्या बोलत होत्या. महिला राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा रोझा किणीकर अध्यक्षस्थानी होत्या. राष्ट्रवादीचे राज्य चिटणीस अ‍ॅड. चिमण डांगे, शहराध्यक्ष शहाजी पाटील, महिला प्रदेश सदस्या कमल पाटील, सविता विश्वनाथ डांगे, रूपाली खंडेराव जाधव, प्रा. डॉ. सूरज चौगुले उपस्थित होते.

डॉ. चौगुले यांनी छोट्या-छोट्या रोजच्या प्रसंग-घटनांमधून सुखी व आनंदी जीवन कसे जगायचे यावर व्याख्यान दिले.

धनगर समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष अ‍ॅड. चिमण डांगे, कैकाडी समाजाच्या महिला जिल्हाध्यक्ष शैलजा जाधव, सोनार समाज महिला जिल्हाध्यक्ष मनीषा पेठकर, पश्चिम महाराष्ट्र चर्मकार समाज संघटनेच्या सचिव सुनीता काळे यांचा सत्कार करण्यात आला.

युवती शहराध्यक्षा प्रियंका साळुंखे हिने स्वागत केले. पुष्पलता राजू खरात यांनी प्रास्ताविक केले. प्राचार्य दीपा देशपांडे, माजी नगरसेविका शुभांगी शेळके, उपाध्यक्षा मालन वाकळे, योगीता माळी, सुवर्णा जगताप, योगिता जाधव उपस्थित होत्या. माया जाधव यांनी आभार मानले.

फोटो ओळी- २००१२०२१-आयएसएलएम-इस्लामपूर सत्कार न्यूज : इस्लामपूर येथे अ‍ॅड. चिमण डांगे यांचा सत्कार सभापती सविता सपकाळ यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रोझा किणीकर, कमल पाटील, सविता डांगे, रूपाली जाधव, दीपा देशपांडे, प्रा. डॉ. सूरज चौगुले उपस्थित होते.

Web Title: Women should make progress by cooperating with each other

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.