महिलांनी सक्षमपणे आपली कर्तव्ये पार पाडावीत : शारदा पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:30 AM2021-03-09T04:30:48+5:302021-03-09T04:30:48+5:30

ओळ : आरळा (ता. शिराळा) येथील सिद्धार्थनगर जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या शारदा ...

Women should perform their duties competently: Sharda Patil | महिलांनी सक्षमपणे आपली कर्तव्ये पार पाडावीत : शारदा पाटील

महिलांनी सक्षमपणे आपली कर्तव्ये पार पाडावीत : शारदा पाटील

Next

ओळ : आरळा (ता. शिराळा) येथील सिद्धार्थनगर जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिनानिमित्त आयाेजित कार्यक्रमात जिल्हा परिषद सदस्या शारदा पाटील यांचा केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी यांनी सत्कार केला. यावेळी मिलिंद धर्माधिकारी, मोहन पवार, लता पाटील उपस्थित हाेते.

लोकमत न्यूज नेटवर्क

शिराळा : महिलांनी समाजात पुढे येऊन आपले काम जबाबदारीने पार पाडले पाहिजे. सक्षमपणे आपली कर्तव्ये पार पाडली पाहिजेत असे प्रतिपादन जिल्हा परिषद सदस्या तथा शिक्षण समिती सदस्या शारदा पाटील यांनी केले.

आरळा (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषद शाळेत जागतिक महिला दिननिमित्त आयाेजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. यावेळी राजमाता जिजाबाई, सावित्रीबाई फुले व रमाबाई आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीपकुमार कुडाळकर, महावितरणचे माजी अभियंता मिलिंद धर्माधिकारी, केंद्रप्रमुख मधुवंती धर्माधिकारी, मुख्याध्यापक मोहन पवार, शुभांगी भोसले, लताराणी पाटील, भाडुगळेवाडीचे मुख्याध्यापक अक्रुर जगदाळे, शुभांगी भोसले, ग्रामपंचायत सदस्या जया कांबळे, विजय भाडुगळे, अध्यक्षा नेत्रा झाडे, मेघा पाटील, मनीषा झाडे, प्रतीक्षा शेळके, लता पाटील, अरुण टिपुगडे, आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहन पवार यांनी केले. लताराणी पाटील यांनी आभार मानले.

Web Title: Women should perform their duties competently: Sharda Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.