कोरोना संकटाशी महिलांचा खंबीर सामना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:27 AM2021-01-25T04:27:26+5:302021-01-25T04:27:26+5:30
पलूस : महापूर असो किंवा कोरोनाचे संकट, अशावेळी घराघरातील माता-भगिणींनी या कठीण काळाला तोंड दिले. यामुळे या संकटाचा आपण ...
पलूस : महापूर असो किंवा कोरोनाचे संकट, अशावेळी घराघरातील माता-भगिणींनी या कठीण काळाला तोंड दिले. यामुळे या संकटाचा आपण सामना करू शकलो, असे प्रतिपादन कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजीत कदम यांनी केले.
पलूस येथे पलूस तालुका महिला कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आयोजित कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. कदम बोलत होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक महेंद्र लाड यांच्याहस्ते झाले.
मंत्री डॉ. कदम म्हणाले, ‘कँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष सोनिया गांधी यांनी सत्तेत महिलांना ५० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला. यामुळेच आज महिला सक्षमपणे पुरुषाच्या बरोबरीने काम करत आहेत. कोरोनाच्या कालावधीत महिला डॉक्टर, अधिकारी, ग्रामपंचायत व नगरपालिकांमधील महिला सदस्यांनी पुढे येऊन कौतुकास्पद काम केले.
यावेळी डॉ. रागिणी पवार, डॉ. संगीता देशमुख, डॉ. मीनाक्षी सावंत, श्वेता बिरनाळे, डॉ. पंकज पलंगे उपस्थित होत्या. ज्येष्ठ कवयित्री वासंती मेरू यांनी आपल्या कवितांमधून महिलांना अंतर्मुख केले. या कार्यक्रमाचे संयोजन महिला कॉंग्रेसच्या अध्यक्ष श्वेता बिरनाळे, प्रतिभा पाटील, रेखा भोरे, सुनीता कांबळे, प्रतिभा डाके, अंजनी मोरे, स्वाती गोंदील, उज्ज्वला मोरे, सुरेखा माळी, डॉ. मुक्ता दिवटे यांनी केले.
फोटो-२३सावंतपुर१