सांगलीत कचरा निर्मूलनासाठी महिलांचा पुढाकार घरोघरी जाऊन प्रबोधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2019 12:04 AM2019-04-02T00:04:55+5:302019-04-02T00:05:56+5:30
ओला, सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाविषयी दिली जातेय माहिती सांगली : शहरातील महिलांनी एकत्र येत कचरामुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी या महिला घरोघरी जाऊन कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण, कचºयापासून खत निर्मिती यावर प्रबोधन करतात
सांगली: ओला, सुका कचऱ्याच्या वर्गीकरणाविषयी दिली जातेय माहिती सांगली : शहरातील महिलांनी एकत्र येत कचरामुक्तीसाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी या महिला घरोघरी जाऊन कचऱ्याचे ओला व सुका असे वर्गीकरण, कचºयापासून खत निर्मिती यावर प्रबोधन करतात. वयाची सत्तरी ओलांडलेल्या महिलांपासून ते अगदी २३ वर्षाच्या तरुणीपर्यंत साऱ्यांनी मिळून कचºयाचे निर्मूलन करण्याचा विडा उचलला आहे. शिवाजीनगर परिसरात श्रीमती मंदाताई मराठे या सत्तरी पार केलेल्या महिलेने त्यासाठी पुढाकार घेतला. अनेक घरात जाऊन त्या घरातल्या कचºयाचे महत्त्व समजावून सांगत असतात. त्यांच्या जोडीला कीर्ती महाजन, स्नेहा परचुरे, शैला गोखले, डॉ. कविता मगदूम, वैशाली तळे यांच्यासह अन्य युवतींपासून ज्येष्ठ महिलांपर्यंतची टीम शहरात अनेक भागात जाऊन कचºयापासून घरच्या घरी खत निर्मिती कशी करता येईल, याचे प्रात्यक्षिक देतात.
यासाठी नागरिक दक्षता समिती स्थापन केली आहे. यात कुणी अध्यक्ष नाही, उपाध्यक्ष नाही, पदाधिकारी नाही. सर्वच कार्यकर्ते म्हणून समाजासाठी काम करतात. त्यांच्याबरोबर महापालिकेचे आरोग्य कर्मचारी असतात. या सर्व महिलांनी आपल्या घरातला कचरा घरातच कुजवून तो फुलझाडांना खत म्हणून वापरला आहे. काही महिलांनी घरापुरता सेंद्रिय पध्दतीने भाजीपाला पिकवला आहे. यामुळे सर्व कचरा घरातच कुजवला जातो. मिरजेतील निसर्ग संवाद या संस्थेला घरातला प्लास्टिक कचरा दिला जातो. मंदाताई मराठे म्हणाल्या, शहरात कुठे रस्त्यावर टाकलेला कचरा पाहिला की मनात हळहळ होते. त्यात कचरा पेटवला गेलेला दिसला की वाईट वाटते. आपण घरातल्या कचºयाची विल्हेवाट लावू शकतो. कचरा साठवून त्यापासून खत तयार करता येते. घरातल्या आवारातील झाडांना याचा उत्तम वापर करता येतो. झाडांनाही भूक असते. ही भूक भागवण्यासाठी याचा उपयोग होऊ शकतो.
कचरा जाळण्याची गरज नाही. ओल्या कचºयापासून घरगुती खत कसे तयार करायचे, याचे आम्ही प्रात्यक्षिक देते. घरोघरी जाऊन कचरा विलगीकरण आणि कंपोस्टिंग याविषयी माहिती देतो. यासाठी पालिकेचे सहकार्य असतेच. कीर्ती महाजन म्हणाल्या, मंदाताई मराठे यांच्यापासून ऊर्जा घेऊन मीही घरातच कचरा कुजवायला सुरुवात केली. कचºयापासून खत तयार करुन भाजीपाला लावला. लोकांनाही प्रबोधन करते. स्नेहा परचुरे, डॉ. कविता मगदूम, गौरी पटवर्धन याही कचºयापासून खत तयार करीत आहेत. तसेच लोकांच्या प्रबोधनाची जबाबदारीही पार पाडत आहेत.