स्वच्छता अभियानात महिलांचा सहभाग महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:11 AM2021-01-24T04:11:58+5:302021-01-24T04:11:58+5:30
खानापूर नगर पंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत संपूर्ण शहरांमध्ये जनजागृती करताना शहरातील सर्व प्रभागांत विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत ...
खानापूर नगर पंचायतीने स्वच्छ सर्वेक्षण २०२१ अंतर्गत संपूर्ण शहरांमध्ये जनजागृती करताना शहरातील सर्व प्रभागांत विविध उपक्रम राबवून नागरिकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती करण्यात येत आहे. ओला-सुका घातक कचरा वर्गीकरण, प्लास्टिक बंदी, परिसर स्वच्छता, घरगुती कचऱ्यापासून सेंद्रिय खत निर्मिती तसेच घ्यावयाची काळजी याबाबत मार्गदर्शन कार्यशाळा, कोपरा सभा असे विविध उपक्रम नगर पंचायतीच्या वतीने राबविण्यात येत आहेत.
स्वच्छ विभागाच्या आयसी विभागाने प्रभाग १ व २ येथील नागरिकांना मोहिमेबाबत सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमास महिलांनी लक्षणीय उपस्थिती राखत शहर स्वच्छतेबाबत निर्धार केला.
आरोग्य निरीक्षक गणेश धेंडे यांनी शहरांमधील स्वच्छता जनजागृतीची माहिती दिली.
यावेळी नगरसेविका नूतन टिंगरे, नगरसेविका सुरेखा डोंगरे यांनी प्रभागातील घरोघरी जाऊन जनजागृती केली. याप्रसंगी गटनेत्या मंगल मंडले, माजी नगराध्यक्षा भारती माने, माजी उपनगराध्यक्षा स्वाती टिंगरे, सुनीता भगत, नगरसेविका डॉ. वैशाली हजारे, नगरसेविका रेखा कदम, शहर समन्वयक विनायक तंडे, स्वच्छ सर्वेक्षण आयसी विभागाच्या राखी माने, दिव्यानी हराळे आदी उपस्थित होते.