बिळाशी आराेग्य केंद्राचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2021 04:26 AM2021-04-22T04:26:17+5:302021-04-22T04:26:17+5:30

स्वातंत्र्य लढ्यामध्ये बिळाशीचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपासून बिळाशी भेडसगाव परिसरातील ग्रामस्थांकडून पूल, वाकुर्डेमार्गे रस्ता व प्राथमिक आरोग्य केंद्र ...

Work on Bilashi Health Center completed | बिळाशी आराेग्य केंद्राचे काम पूर्ण

बिळाशी आराेग्य केंद्राचे काम पूर्ण

Next

स्वातंत्र्य लढ्यामध्ये बिळाशीचे योगदान मोठे आहे. स्वातंत्र्य प्राप्तीपासून बिळाशी भेडसगाव परिसरातील ग्रामस्थांकडून पूल, वाकुर्डेमार्गे रस्ता व प्राथमिक आरोग्य केंद्र या प्रमुख मागण्या हाेत्या. मानसिंगराव नाईक यांच्या प्रयत्नाने २०११-१२ मध्ये बिळाशी, येळापूर, पाचगणी व शिराळा येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न मार्गी लागला. तत्कालीन आरोग्यमंत्र्यांनी याला मंजुरी दिली. परंतु निधीअभावी ही केंद्रे चालू झाली नाहीत. २०१९ मध्ये मानसिंगराव नाईक आमदार झाल्यानंतर बिळाशी आरोग्य केंद्राचा प्रश्न त्यांनी तातडीने मार्गी लावला. विद्यमान आरोग्य मंत्री राजेश टोपे, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत सप्टेंबर २०१९ मध्ये आरोग्य केंद्राची पायाभरणी करण्यात आली. अवघ्या दीड वर्षात या आरोग्य केंद्राचे काम पूर्ण झाले. या आरोग्य केंद्रामुळे मांगरूळ, रिळे, पावलेवाडी, धसवाडी, कुसाईवाडी, दुरंदेवाडी, मोरेवाडी, वीरवाडी येथील नागरिकांची सोय होणार आहे. सध्या येथील आरोग्य केंद्रात कोविडचे लसीकरण सुरू आहे. बिळाशी-कुसाईवाडी रस्त्यालगत नागोबा मंदिर व गाव तळ्याच्या शेजारी उभी असलेली ही इमारत गावाच्या सौंदर्यात भर घालत आहे.

Web Title: Work on Bilashi Health Center completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.