ऐतवडे बुद्रूकमध्ये स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:32 AM2021-09-10T04:32:16+5:302021-09-10T04:32:16+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क ऐतवडे बुद्रूक : ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी नद्यांसाह गाव ओढ्यांना महापुराचा मोठा फटका बसला. यात ऐतवडे बुद्रूक ...

Work on the cemetery begins at Aitwade Budruk | ऐतवडे बुद्रूकमध्ये स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात

ऐतवडे बुद्रूकमध्ये स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

ऐतवडे बुद्रूक : ऑगस्ट महिन्याच्या प्रारंभी नद्यांसाह गाव ओढ्यांना महापुराचा मोठा फटका बसला. यात ऐतवडे बुद्रूक (ता. वाळवा) येथे चार ठिकाणी विस्तारलेल्या दलितवस्तीसाठी असलेली स्मशानभूमी पुराच्या पाण्यात वाहून गेली होती. तेव्हा समाजातील लोकांपुढे अंत्यसंस्काराच्या प्रश्न गंभीर बनला होता. याची दखल घेऊन सरपंच प्रतिभा बुद्रूक, उपसरपंच अशोक दिंडे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय कोळी यांनी स्मशानभूमीच्या कामाला सुरुवात केली. समाजातील तरुणांनी याबाबत ग्रामपंचायतकडे पाठपुरावा करताच सरपंच प्रतिभा बुद्रूक, उपसरपंच अशोक दिंडे, ग्रामविकास अधिकारी दत्तात्रय कोळी यांनी तातडीने स्मशानभूमीच्या तात्पुरत्या दुरुस्तीसाठी पंधराव्या वित्त आयोगातून निधीची तरतूद केली. याचे गुरुवारपासून तत्काळ काम सुरू करण्यात आले आहे. जिल्हा परिषद सदस्य यांच्या निधीतून नूतन स्मशानभूमीचादेखील प्रस्ताव करण्यात आला आहे. त्यामुळे हे तात्पुरते दुरुस्तीचे कामदेखील उत्तम दर्जाचे व्हावे, यासाठी वर्धमान बुद्रूक, ग्रामविकास अधिकारी हे यांनी कामाची पाहणी केली. तसेच काम तातडीने व चांगले करण्याच्या ठेकेदार यांना सूचना केल्या. मृत्यूनंतर त्यांच्यावर अंत्यसंस्काराची होत असलेली गैरसोय आता टळणार आहे.

Web Title: Work on the cemetery begins at Aitwade Budruk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.