हरिपूर ग्रामपंचायत येथे आपत्ती व्यवस्थापन समितीचे कार्य उल्लेखनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 27, 2021 04:29 AM2021-05-27T04:29:16+5:302021-05-27T04:29:16+5:30

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे कोरोना बंदोबस्तासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीचे कार्य उल्लेखनीय आहे. सरपंच विकास हणबर, अरविंदभाऊ तांबवेकर, ...

The work of Disaster Management Committee at Haripur Gram Panchayat is remarkable | हरिपूर ग्रामपंचायत येथे आपत्ती व्यवस्थापन समितीचे कार्य उल्लेखनीय

हरिपूर ग्रामपंचायत येथे आपत्ती व्यवस्थापन समितीचे कार्य उल्लेखनीय

Next

सांगली : हरिपूर (ता. मिरज) येथे कोरोना बंदोबस्तासाठी आपत्ती व्यवस्थापन समितीचे कार्य उल्लेखनीय आहे. सरपंच विकास हणबर, अरविंदभाऊ तांबवेकर, तलाठी श्रीनिवास पाटील, वर्षा सूर्यवंशी, पोलीस पाटील उमाकांत बोंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली समिती कार्यरत आहे. दर आठ दिवसांनी आढावा बैठक घेण्यात येत आहे.

या उपक्रमात ग्रामपंचायत सदस्य, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका / मदतनीस, पोलीस मित्र, जिल्हा परिषद शाळा नं. १ व २, जायंट्स ग्रुप प्रेरणा सहेलीच्या सदस्या यांच्या सहकार्याने यंत्रणा काम करीत आहे.

आरोग्य केंद्राच्या डॉ. स्वाती चौगुले, आरोग्यसेविका अमृता परीट, आशा वर्कर्स, अंगणवाडी सेविका / मदतनीस यांचे कार्य कौतुकास्पद आहे. जायंट्स ग्रुप प्रेरणा सहेलीच्या सुनीता शेरीकर, हरमितकौर पाटील, सुचेता हरळीकर, वैशाली माने, वैशाली पाचुंदे यांचेही सहकार्य लाभले.

Web Title: The work of Disaster Management Committee at Haripur Gram Panchayat is remarkable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.