कोरोनाच्या काळात डॉक्टरांचे कार्य कौतुकास्पद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:19 AM2021-07-02T04:19:30+5:302021-07-02T04:19:30+5:30
आष्टा : कोरोनाच्या महामारीत आष्टा शहरातील डॉक्टरांनी केलेले काम कौतुकास्पद व आदर्शवत आहे. सर्वच डॉक्टरांनी सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून ...
आष्टा : कोरोनाच्या महामारीत आष्टा शहरातील डॉक्टरांनी केलेले काम कौतुकास्पद व आदर्शवत आहे. सर्वच डॉक्टरांनी सामाजिक बांधीलकीचे भान ठेवून सामाजिक बांधीलकी जपली आहे, असे प्रतिपादन आष्टा शहर विकास आघाडीचे नेते वैभव शिंदे यांनी व्यक्त केले.
राजाराम शिक्षण संस्थेच्या वतीने डॉक्टर्स डे निमित्त आयोजित डॉक्टरांच्या सत्कार समारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ धन्वंतरी डॉ. मनोहर कबाडे, आष्टा डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष डॉ. विजय गंगाधर, डॉ. प्रकाश आडमुठे, वरदराज शिंदे, डॉ. दिलीप कटरे, डॉ. विपुल गुरव प्रमुख उपस्थित होते.
डॉ. मनोहर कबाडे म्हणाले, विलासराव शिंदे यांनी डॉक्टर असोसिएशनला नेहमीच सहकार्य केले. वैभव शिंदे यांनी यापुढील काळात डॉक्टर असोसिएशनच्या पाठीशी उभे राहावे. नगरपालिकेच्या माध्यमातून एखादी जागा मिळावी.
डॉ. प्रकाश आडमुटे, डॉ. दिलीप कटरे, डॉ. विजय गंगधर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी डॉ. सुभाष पाटील, डॉ. दिग्विजय पाटील, डॉ. सुजय कबाडे, डॉ. अमोल पाटील, डॉ. संतोष सावंत, डॉ. प्रफुल आडमुठे, दत्तराज हिप्परकर, सागर जगताप, दीपक थोटे उपस्थित होते.