मिरज-कृष्णाघाट रेल्वे उड्डाणपुलाचे काम लवकरच सुरू होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:23 AM2021-01-17T04:23:40+5:302021-01-17T04:23:40+5:30
मिरज-कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वेमार्गावर रेल्वे गेटमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. येथे अनेक वर्षांची उड्डाणपुलाची मागणी आहे. आमदार ...
मिरज-कृष्णाघाट रस्त्यावर रेल्वेमार्गावर रेल्वे गेटमुळे वारंवार वाहतूक कोंडी होते. येथे अनेक वर्षांची उड्डाणपुलाची मागणी आहे. आमदार सुरेश खाडे यांनी या उड्डाणपुलासाठी रेल्वे प्रशासन व केंद्र शासनाकडे पाठपुरावा केला आहे. येथे उड्डाणपुलासाठी पाच वर्षांपूर्वी मंजुरी मिळाली आहे. आवश्यक कागदोपत्री सोपस्कार व विविध विभागाच्या परवानग्या मिळाल्या आहेत. मात्र, रस्त्यासाठी भूसंपादन प्रक्रिया रखडल्याने उड्डाणपुलाचे काम अद्याप सुरू झालेले नाही. उड्डाणपुलासाठी आवश्यक भूसंपादन प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याची सूचना आमदार सुरेश खाडे यांनी रेल्वेच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
रेल्वे गेट पलीकडे झोपडपट्टी स्थलांतराचा मोठा अडथळा आहे. महापालिका आयुक्त व संबंधित नगरसेवकांशी चर्चा करून झोपडपट्टी स्थलांतराबाबत निर्णय घेण्यात येईल, असे खाडे यांनी रेल्वे अधिकाऱ्यांना सांगितले. रेल्वे उड्डाणपूल झाल्यानंतर मिरजेतून शिरोळ, नृसिंहवाडी येथे जाण्यासाठी अडथळा दूर होणार आहे.
फाेटाे : १६ मिरज १