आराखड्यानंतर लगेच संभाजी महाराज स्मारकाचे काम सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2021 04:32 AM2021-09-07T04:32:54+5:302021-09-07T04:32:54+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शिराळा : येथील भुईकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी आणखी काय काय करणे शक्य आहे, याचा ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : येथील भुईकोट किल्ल्यावरील छत्रपती संभाजी महाराज स्मारकासाठी आणखी काय काय करणे शक्य आहे, याचा आराखडा तयार करण्यात येत आहे. त्याचे काम संपताच तातडीने निर्णय होऊन स्मारक उभारणीच्या कामास सुरुवात होईल, अशी माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे दिली.
येथील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्याची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. यावेळी आमदार मानसिंगराव नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष देवराज पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विराज नाईक, तहसीलदार गणेश शिंदे, नगराध्यक्षा सुनीता निकम आदी उपस्थित होते.
मंत्री पाटील यांनी, येथे नियोजित छत्रपती संभाजी महाराजांचे स्मारक, चित्रनगरी, अश्वारूढ पुतळा यासाठी जागेची पाहणी केली. याबाबत मुंबईत तीन बैठका घेण्यात आल्या आहेत. यासाठी आणखी काय काय करणे शक्य आहे, याचा आराखडा तयार करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.