सर्वोदय शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:40 AM2021-02-23T04:40:57+5:302021-02-23T04:40:57+5:30

उमदी : सर्वोदय शिक्षण संस्थेमुळे उमदीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा वाहिली आहे. संस्थेमुळे परिसरातील गरीब व शिक्षणापासून वंचित मुलांना ...

The work of Sarvodaya Shikshan Sanstha is commendable | सर्वोदय शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद

सर्वोदय शिक्षण संस्थेचे कार्य कौतुकास्पद

Next

उमदी : सर्वोदय शिक्षण संस्थेमुळे उमदीसारख्या ग्रामीण भागात शिक्षणाची गंगा वाहिली आहे. संस्थेमुळे परिसरातील गरीब व शिक्षणापासून वंचित मुलांना शिक्षणाची सोय झाली आहे. संस्थेचे कार्य कौतुकास्पद असल्याचे मत मुंबई उपनगरचे उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांनी व्यक्त केले.

उमदी (ता. जत) गावचे पुत्र व उपजिल्हाधिकारी मल्लिकार्जुन माने यांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याहस्ते गौरविण्यात आले आहे. तसेच भारत सरकार संलग्न मानवी हक्क संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र विभागाच्या चौकशी अधिकारी सल्लागारपदी ॲड. चन्नाप्पाण्णा होर्तीकर यांची निवड झाली, याबद्दल माने व होर्तीकर यांचा सर्वोदय शिक्षण संस्था संचलित महात्मा विद्यामंदिर व ज्युनियर काॅलेजतर्फे सत्कार करण्यात आला. अध्यक्षस्थानी तज्ज्ञ संचालक आमगोंडा पाटील, तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रेश्माक्का होर्तीकर व सचिव एस. के. होर्तीकर उपस्थित होते.

यावेळी फिरोज मुल्ला, रवी शिवपुरे, मुख्याध्यापक रमेश खरोशी, मच्छिंद्र इम्मणवर, डी. सी. बासरगाव, एस. सी. जमादार उपस्थित होते.

प्राचार्य एस. के. होर्तीकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. श्रीशैल मालापुरे यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. घन:श्याम चौगुले यांनी आभार मानले.

Web Title: The work of Sarvodaya Shikshan Sanstha is commendable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.