मिरजेत खंदकात भाजी मंडईचे काम लवकरच सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:27 AM2021-03-05T04:27:20+5:302021-03-05T04:27:20+5:30
मिरज : मिरजेत किल्ला भागातील खंदकात नवीन भाजी मंडईच्या कामास मंजुरी घेऊन येत्या वीस दिवसांत भाजी मंडईचे काम ...
मिरज : मिरजेत किल्ला भागातील खंदकात नवीन भाजी मंडईच्या कामास मंजुरी घेऊन येत्या वीस दिवसांत भाजी मंडईचे काम सुरू करणार असल्याचे नूतन महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.
मी मिरजकर फाउंडेशनतर्फे महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांचा सुधाकर खाडे यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.
दिग्विजय सूर्यवंशी म्हणाले, मिरजेत पाच ओपन जिम सुरू करण्याबाबत तातडीने कार्यवाही करणार आहे. मिरज सिव्हिल हॉस्पिटल चौक ते शास्त्री चौक हा रस्त्याच्या कामास राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाची मंजुरी मिळाली असून, या कामाचा पाठपुरावा करण्यात येईल.
यावेळी सुधाकर खाडे यांनी रस्ता दुरुस्तीचे काम ८० टक्के पूर्ण झाल्याबद्दल मिरजेतील सर्व नगरसेवकांचे आभार मानले. मिरज शहरातील ऐतिहासिक वास्तूचे संवर्धन सुशोभिकरण याकडे मी मिरजकर फाैंडेशन लक्ष देणार असल्याचे व शहर सुशोभिकरणासाठी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन हा उपक्रम राबविण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
मिरजकर फाउंडेशनच्या बैठकीत ‘मिरज फेस्टिव्हल’च्या आयोजनाचा निर्णय घेण्यात आला. यावेळी नितीन सोनवणे, प्रा. डॉ. रवींद्र फडके, शीतल पाटोळे, विलास देसाई, ॲड. शेखर करंदीकर, महेश गव्हाणे, सचिन पाटील, प्रदीप कोरे, युनूस चाबुकस्वार, डॉ. व्यंकटेश कुलकर्णी, मनविंदरसिंग चड्डा, अविनाश शिंदे, राजू गवळी, युवराज मगदूम, मनोहर कुरणे आदी उपस्थित होते.