वारणा शिक्षण संस्थेचे कामकाज आदर्शवत : श्रीनिवास पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2021 04:51 AM2021-02-28T04:51:10+5:302021-02-28T04:51:10+5:30
ओळ : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा महाविद्यालयात खा. श्रीनिवास पाटील यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. ...
ओळ : ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा महाविद्यालयात खा. श्रीनिवास पाटील यांचा महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
कुरळप : वारणा शिक्षण संस्था संचलित वारणा महाविद्यालय हे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबरोबरच बौद्धिक विकासासाठी सदैव प्रयत्नशील असते. वारणा शिक्षण संस्थेचे कामकाज आदर्श आहे, असे प्रतिपादन सिक्कीमचे माजी राज्यपाल व विद्यमान खा. श्रीनिवास पाटील यांनी केले.
ऐतवडे खुर्द (ता. वाळवा) येथील वारणा महाविद्यालयास कायम संलग्नता मिळाल्यानंतर विद्यापीठ अनुदान आयोगाकडून मानांकन मिळाले. त्यानिमित्त श्रीनिवास पाटील यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पाटील म्हणाले, क्रीडात्मक गुणाबरोबरच विद्यार्थ्यांची आकलन क्षमता वाढविण्यावर भर दिला पाहिजे. वारणा महाविद्यालय नक्कीच यासाठी उपक्रम राबवेल.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र राज्य सहकारी संघाचे अध्यक्ष डॉ. प्रताप पाटील म्हणाले की, विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून वारणा महाविद्यालयाचे कामकाज सुरू आहे. या प्रगतीचा आलेख असाच वर चढत राहणार आहे.
याप्रसंगी संस्थेचे विश्वस्त व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक उपस्थित होते. हिंदी विभागप्रमुख डॉ. सूरज चौगुले यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भूगोल विभागप्रमुख सुरेश इंगळे यांनी आभार मानले.