कष्टकरी जनतेकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 14, 2019 11:22 PM2019-04-14T23:22:51+5:302019-04-14T23:22:55+5:30

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे ...

The working people ignore all the political parties | कष्टकरी जनतेकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष

कष्टकरी जनतेकडे सर्वच राजकीय पक्षांचे दुर्लक्ष

Next

शरद जाधव । लोकमत न्यूज नेटवर्क । सांगली : सांगली मतदारसंघातील प्रतिष्ठित-ख्यातनाम कलावंत, साहित्यिक, सामाजिक कार्यकर्ते या लोकसभा निवडणुकीकडे कशापद्धतीने पाहतात, त्यांच्या नजरेतून कोणते महत्त्वाचे मुद्दे चर्चिले जायला हवेत, याचा आढावा घेणारी ही मुलाखत...कामगार नेते विकास मगदूम यांच्या नजरेतून लोकसभा निवडणूक

चळवळीतील कार्यकर्ते म्हणून तुम्ही सध्याच्या निवडणूक वातावरणाकडे कसे पाहता?
निवडणुकांमुळे सर्वसामान्यांच्या जीवनावर काहीच परिणाम होत नाही. कोणताही पक्ष असला तरी त्यांना विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती बांधणे एवढाच वाटत आहे. याउलट जीवनमान उंचाविण्याकडे कोणीच लक्ष देत नाही. देशात ४२ कोटींच्या वर असणाऱ्या कष्टकरी जनतेकडे कोणी लक्ष देत नाही. समाजातील आवश्यक प्रश्न बाजूला पडले आहेत.
लोकसभा निवडणुकीत कोणते महत्त्वाचे मुद्दे असायला हवेत?
सकल राष्टÑीय उत्पादनात ६५ टक्के योगदान असणाºया कष्टकरी जनतेला सामाजिक सुरक्षा मिळत नाही. काम करत आहे तोवरच तुटपुंजे उत्पन्न. मात्र, थकल्यानंतर त्यांच्या अन्न, औषधांचीही आबाळ होताना दिसते. संविधानानुसार जसे सन्मानाने जगता आले पाहिजे, तसेच सन्मानाने मरणही आले पाहिजे. असा दिलासा देणारा मुद्दा कोणीही विचारात घेत नाही. शेतकऱ्यांनाही केवळ कर्जमाफी न देता त्यांना वेळेवर पुरेसे पाणी व वीज उपलब्ध करून दिल्यास कर्जमाफीची वेळच येणार नाही.
तुमच्या क्षेत्राशी निगडित मुद्द्यांना राजकीय पक्ष किती महत्त्व देतात?
स्वातंत्र्यापासूनच कामगारवर्ग आपल्या हक्कासाठी लढत आहे. १९९१ च्या उदारीकरणाच्या धोरणानंतर संघटित, असंघटित क्षेत्रातील कामगार, प्रशासकीय वर्ग सोडला, तर चळवळीला भवितव्य उरलेले नाही. अनेक कामगारांना साप्ताहिक सुटी नाही, १३ ते १४ तास काम करावे लागते. विशेष म्हणजे देशात संख्येने बहुसंख्य असलेल्या कष्टकरी जनतेच्या प्रश्नांवर एकही राजकीय पक्ष बोलत नाही. त्यांनी कष्टकरी जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य द्यायला हवे.
नवीन मतदारांना
काय आवाहन कराल?
नवमतदारांनी आमिषाला बळी न पडता निर्भिडपणे मतदान करण्यास पुढे यावे. राजकीय व्यवस्थेविरोधातील आपला रोष व्यक्त करण्यासाठी पाच वर्षांतून एकदा संधी मिळते. ही संधी तरूणांनी वाया घालवू नये.

Web Title: The working people ignore all the political parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.