मिरजेत साळुंखे महाविद्यालयात 'काेविड व भारतीय महिला' कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 10, 2021 04:18 AM2021-07-10T04:18:48+5:302021-07-10T04:18:48+5:30
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. उषादेवी साळुंखे यांनी इतिहासकाळापासून आजच्या कोविड संकटाच्या परिस्थितीत स्त्रियांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गाैरव केला. ...
कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. उषादेवी साळुंखे यांनी इतिहासकाळापासून आजच्या कोविड संकटाच्या परिस्थितीत स्त्रियांनी समाजासाठी दिलेल्या योगदानाचा गाैरव केला. डॉ. शैलजा माने यांनी कोविड परिस्थितीत गर्भवती महिलांसमोरील आव्हाने, ऑनलाईन शिक्षणपद्धतीत मुलांची आई म्हणून असलेली आव्हाने, विविध सामाजिक, धार्मिक, पर्यटन सेवा पुरविणाऱ्या, लघुउद्योगात काम करणाऱ्या, बचतगट चालविणाऱ्या महिलांसमोर असणारी आव्हाने यावर भाष्य करताना सध्य:स्थितीत महिलांसाठी निर्माण झालेल्या नवीन रोजगार संधींचीही माहिती त्यांनी दिली. डॉ. प्रतिभा देसाई यांनी कोविड साथीत आशा वर्कर्सचे योगदान व त्यांच्या समस्याबाबत माहिती दिली.
प्राचार्य डॉ. जे. एल. भोसले अध्यक्षस्थानी होते. डॉ. पी. जी. पाटील यांनी प्रास्ताविक केले. प्रा. व्ही. ए. पाटील, ए. व्ही. पोतलवाड, लेफ्टनंट दिगंबर नागर्थवर यांनी संयोजन केले. सौ. एस. पी. हाके यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अर्चना जाधव यांनी आभार मानले.