शाळाबाह्य मुलांसाठी शिराळा येथे कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2021 04:35 AM2021-02-27T04:35:48+5:302021-02-27T04:35:48+5:30
पुनवत : शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची शिराळा येथे कार्यशाळा झाली. सहायक गटविकास अधिकारी अरविंद माने, गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, ...
पुनवत :
शाळाबाह्य मुलांच्या सर्वेक्षणाची शिराळा येथे कार्यशाळा झाली. सहायक गटविकास अधिकारी अरविंद माने, गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर, सांगली डायटचे आधिव्याख्याता डॉ. राजेंद्र भोई आदी उपस्थित होते.
यावेळी गटशिक्षणाधिकारी प्रदीप कुडाळकर यांनी १ ते १० मार्चदरम्यान शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण पूर्ण करून एकही मुलं शाळाबाह्य राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आवाहन केले. गाव, पाल, रेल्वेस्थानक, वीटभट्टी, बसस्थानक, ऊसतोड मजूर उतरलेली ठिकाणे. या सर्व जागी हे सर्वेक्षण होणार आहे.
प्रगणक म्हणून सर्व माध्यमातील शिक्षक, अंगणवाडीसेविका यांची नेमणूक करण्यात येणार आहे. शालेय कामकाजावर कोणताही परिणाम न होता हे सर्वेक्षण होणार आहे.
यावेळी सहायक गटविकास अधिकारी अरविंद माने म्हणाले एकही बालक सर्वेक्षणापासून वंचित राहणार नाही. यासाठी सूक्ष्म नियोजन करावे.
कार्यक्रमास शिक्षण विस्तार बाजीराव देशमुख, विष्णू दळवी, केंद्रप्रमुख सुहास रोकडे, धोंडिराम गोसावी, मधुवंती धर्माधिकारी, केंद्रप्रमुख अलिशा मुलानी, दऱ्याप्पा साळे, हरिभाऊ घोडे, अंगणवाडी पर्यवेक्षिका जानकर, स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी विशाल खुर्द, पर्यायी शिक्षण विषयतज्ज्ञ मधुकर डवरी. नगरपंचायत प्रतिनिधी सुविधा पाटील, बालरक्षक शिक्षक महादेव देसाई तसेच तालुकास्तर समितीमधील सर्व सदस्य व गटसाधन केंद्र शिराळा येथील सर्व कर्मचारी उपस्थित होते.