जागतिक बेघर दिन : सांगलीत बेघर बनले आत्मनिर्भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2020 04:49 PM2020-10-10T16:49:48+5:302020-10-10T16:51:50+5:30
Muncipal Corporation, sangli, World Homeless Day डोक्यावर ना छप्पर... ना नात्यांचा ओलावा... तरीही बेघरांचा जगण्याचा संघर्ष थांबलेला नाही. सांगली शहरातील या बेघरांना महापालिकेच्या सावली निवारा केंद्राने मायेचा आधार दिला. आता त्यांना स्वतःच्या पायावर उभे करुन आत्मनिर्भर बनविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. जागतिक बेघर दिनानिमित्त साधत महापालिकेने सावली केंद्रातील तीन बेघरांना स्वतःचा व्यवसाय सुरु करुन दिला.
सांगली : डोक्यावर ना छप्पर... ना नात्यांचा ओलावा... तरीही बेघरांचा जगण्याचा संघर्ष थांबलेला नाही. सांगली शहरातील या बेघरांना महापालिकेच्या सावली निवारा केंद्राने मायेचा आधार दिला. आता त्यांना स्वतःच्या पायावर उभे करुन आत्मनिर्भर बनविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. जागतिक बेघर दिनानिमित्त साधत महापालिकेने सावली केंद्रातील तीन बेघरांना स्वतःचा व्यवसाय सुरु करुन दिला.
सांगली शहरातील बेघरांसाठी महापालिकेने २५ जानेवारी २०१९ रोजी सावली निवारा केंद्र सुरु केले. सध्या केंद्रामध्ये ४८ बेघर आश्रयाला आहेत. यामध्ये अनेकांना संगणकाचे ज्ञान, सुशिक्षित आहेत. अशा बेघराना सावली केंद्राचे व्यवस्थापक मुस्तफा मुजावर यांनी व्यवसाय प्रशिक्षण देऊन त्यांना सक्षम केले आहे. यासाठी महापालिका आयुक्त नितीन कापडणीस, उपायुक्त स्मृती पाटील, राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाचे ज्योती सरवदे यांची मोठी साथ मिळाली आहे.
जागतिक बेघर दिनाचे औचित्य साधत महापालिकेने सावली केंद्रातील ३ बेघरांना व्यवसाय सुरू करुन दिला. यामध्ये एकास भाजीपाला विक्रीचा हातगाडी, तर अन्य दोघाना शिलाई यंत्रावर काम उपलब्ध करून देण्यात आले आहे. तसेच केक कापून हा दिवस साजरा करण्यात आला.