नलवडे मामांचे कुस्तीसाठीचे योगदान अतुलनीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 15, 2018 11:08 PM2018-04-15T23:08:00+5:302018-04-15T23:08:00+5:30

Wrestling contribution to Nalvade Maa is incomparable | नलवडे मामांचे कुस्तीसाठीचे योगदान अतुलनीय

नलवडे मामांचे कुस्तीसाठीचे योगदान अतुलनीय

Next


सांगली : वसंतदादांच्या नावाने कुस्ती केंद्राची उभारणी करून त्यांचा नावलौकिक संपूर्ण देशभरात निर्माण करण्यात कुस्ती प्रशिक्षक राममामा नलवडे यांची भूमिका महत्त्वाची आहे. कुस्तीसाठी आयुष्य वेचताना अनेक भल्याबुऱ्या प्रसंगांना मामा सामोरे गेले. तालमीत कडक शिस्त लावण्याबरोबरच पैलवानांना माणुसकी शिकविणाºया नलवडे मामांचे जिल्ह्यातील कुस्तीसाठी अतुलनीय योगदान असल्याचे प्रतिपादन माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी रविवारी येथे केले.
यशवंतनगर येथील वसंतदादा कुस्ती केंद्रात झालेल्या शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कुस्ती प्रशिक्षक, प्राचार्य राम नलवडे यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी नलवडे यांच्या ‘माती आणि मोती’ या आत्मचरित्राचे प्रकाशनही करण्यात आले.
पाटील म्हणाले, राममामांचा अगदी लहानपणापासून सहवास मिळाला. त्यांच्याकडून खूप काही शिकता आले. तालमीत कडक शिस्त पाळणारे मामा, बाहेर मात्र अतिशय प्रेमळ असतात. कुस्तीवर आलेल्या चित्रपटामुळे सध्या या खेळाकडे तरूणांचा ओढा वाढत आहे. तरूणांमधील कुस्तीप्रती असलेले आकर्षण कायम ठेवण्यासाठी कुस्ती केंद्राच्या माध्यमातून प्रयत्न करायला हवेत. त्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल. वसंतदादा कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील, पुस्तकाचे प्रकाशक सुनील पाटील, कुस्ती निवेदक शंकर पुजारी यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवछत्रपती पुरस्कारप्राप्त कुस्ती प्रशिक्षक चंद्रकांत चव्हाण, जयश्रीताई पाटील, संभाजीराव पाटील-सावर्डेकर, मुन्ना कुरणे, प्रा. एम. एस. राजपूत, राहुल पवार, सुनीलदत्त पाटील, नगरसेवक प्रशांत पाटील, उमेश पाटील, जि. प. सदस्य विशाल चौगुले, प्रकाश जगताप, राहुल नलवडे, दत्ता नलवडे उपस्थित होते.
‘माती आणि मोती’ आत्मचरित्राचे प्रकाशन
वसंतनगर येथील कुस्तीसम्राट युवराज पाटील वाचनालयाच्यावतीने राम नलवडे यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच नलवडे यांनी लिहिलेल्या ‘माती आणि मोती’ या आत्मचरित्राचे प्रकाशनही उपस्थित मान्यवरांच्याहस्ते झाले.

Web Title: Wrestling contribution to Nalvade Maa is incomparable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.